Mango Export : अडचणींवर मात करीत फळांचा ‘राजा’ परदेशात, हंगामात प्रथमच ‘लेट पण थेट’ England ध्येच निर्यात
आंबा फळपिकावर संकटाची मालिक ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण निर्यातीयोग्य आंब्याचे उत्पादन होते की नाही याबाबत शंका होती. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. हे सर्व नुकसानीचे होत असताना आंबा उत्पादकांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. हंगामात यंदा प्रथमच रत्नागिरी हापूसची एंट्री थेट इंग्लडमध्ये झाली आहे.
रत्नागिरी : (Mango Production) आंबा फळपिकावर संकटाची मालिक ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण निर्यातीयोग्य आंब्याचे उत्पादन होते की नाही याबाबत शंका होती. (Unseasonal Rain) अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. हे सर्व नुकसानीचे होत असताना आंबा उत्पादकांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. हंगामात यंदा प्रथमच (Ratnagiri) रत्नागिरी हापूसची एंट्री थेट इंग्लडमध्ये झाली आहे. यामुळे निर्यातीचा मार्ग सुखकर झाला असून भविष्यात निर्यात वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे निर्यात होत असली तरी दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे नुकसान हे सुरुच आहे. आखाती देशापाठोपाठ इंग्लडमध्ये निर्यात सुरु झाली असून परकीय चलनातून का होईना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
पणन अन् कृषी विभागाची मोलाची भूमिका
यंदा आंबा फळपिक धोक्यात असले तरी पणन आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही विभागाने आंबा निर्यातीची प्रक्रिया पूर्ण करुन निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळेच आज आखाती देशासह इंग्लडसारख्या देशामध्येही आंब्याची निर्यात सुरु झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नसलेन तरी निर्यातीमधून अपेक्षित उत्पन्न मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन वर्षापासून कोरोनामुळे निर्यातीमध्ये घट झाली तर यंदा प्रतिकूल परस्थिती. यामुळे निर्यातीबाबत शंकाच होती. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून निर्यातीस प्रारंभ झाला आहे.
3 हजार 500 किलो आंब्याची निर्यात
पुणे येथील एका व्यापाऱ्याकडून ही पहिली निर्यात इंग्लड येथे झाली आहे. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये निर्यातीला सुरवात होणे महत्वाचे होते. अखेर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात का होईना पुणे येथून इंग्लडला निर्यात झाली आहे. 5 किलो आंब्याच्या पेटीला 1800 रुपये दर मिळाला आहे. ही तर सुरवात आहे. त्यामुळे आगामी काळात ही निर्यात वाढणार असल्याचा विश्वास व्यापाऱ्यांना आहे. शिवाय दरही चांगला असल्याने झालेले नुकसान भरुन निघेल का याची उत्सुकता लागलेली आहे.
दोन वर्षापासून निर्यातीमध्ये घट
अगोदर कोरोनामुळे निर्माण झालेली परस्थिती आणि यंदा प्रतिकूल वातावणामुळे घटलेले उत्पादन याचा परिणाम आंबा निर्यातीवर होत आहे. शिवाय आंब्याचा दर्जाही ढासळल्याने निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह होते पण मार्चमध्ये परस्थिती सुधारली आहे. त्यामुळेच आंबा निर्यातीला सुरवात झाली असून आगामी काळात यामध्ये वाढ होऊल असा विश्वास आहे.
संबंधित बातम्या :
Cloudy Weather: ऊन, पावसाच्या खेळात शेती व्यवसायच धोक्यात, यंदा आंबा बेभावात
Cotton Market : पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक ‘झळाळी’, शेतकऱ्यांची रणनिती अन् व्यापाऱ्यांचा फायदा!