स्वप्न सत्यामध्ये : पाणंद रस्त्याच्या आराखाड्याला मंजुरी, ग्रामपंचायतीची भूमिका राहणार महत्वाची
महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या योजनेचे नामकरण करुन मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजना असे करण्यात आले होते. आता केवळ नामकरणच नाही तर प्रत्यक्षात पाणंद रस्ते पक्के करण्याच्या अनुशंगाने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. याची अंमलबजावणी ही तीन टप्प्यात होणार असून यामध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता, शेतामध्ये जाण्याचे पायमार्ग तसेच गाडीमार्ग तयार करण्यात येणार आहेत.
पुणे : (State Government) महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या योजनेचे नामकरण करुन मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, (Farm Road) पाणंद रस्ते योजना असे करण्यात आले होते. आता केवळ नामकरणच नाही तर प्रत्यक्षात पाणंद रस्ते पक्के करण्याच्या अनुशंगाने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. याची अंमलबजावणी ही तीन टप्प्यात होणार असून यामध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता, शेतामध्ये जाण्याचे पायमार्ग तसेच गाडीमार्ग तयार करण्यात येणार आहेत. (Grampanchayat) ग्रामपंचायत पातळीवर या मार्गाचा आराखडा तयार करुन त्यानुसार रस्ते तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. शेतरस्ते हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.
ग्रामपंचायतीची राहणार महत्वाची भूमिका
पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीला याचा आराखडा तयार करावा लागणार आहे. यामध्ये आता अतिक्रमणाचा विषय येणार असून त्या प्रसंगी ग्रामपंचायतीने मध्यस्तीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावा लागणार आहे. शिवाय ग्रामपंचायत स्तरावर ही प्रकरणे निकाली नाहीत निघाली तर मात्र, तालुका स्तरीय समितीकडे हा वाद सादर करुन त्यावर पोलीस यंत्रणेची मदत घेऊन प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
अशी मिळणार पाणंद रस्त्यांना मंजुरी
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेत मंजुर करावा लागणार आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी ही यादी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व त्यानंतर सीईओ यांना. जिल्हा परिषदेचे सीईओ हे 30 जूनपर्यंत रोजगार हमी योजनेच्या सचिवांना यादी सादर करणार आहेत. शिवाय या याद्यांवर अभ्यास करुन सचिव मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत. 15 ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
असे असणार आहे मापदंड
रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडानुसार बांधण्यात येणार आहेत. जागेच्या उपलब्धतेनुसार रुंदीमध्ये फरक पडेल मात्र, ऊंची, खडीचा आकार, खडी परताची जाडी, पाणी निचऱ्यासाठी नाले, बाजूची झाडे, गुणवत्तेची चाचणी ही केली जाणारच आहे. योग्य ते मापदंड लावून रस्ता चांगल्या प्रतीचा कसा होईल यावरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर खोदून त्यामध्ये निघालेली माती आणि मुरुम हे रस्त्यात टाकण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Cotton : कापूस दरात वाढ, शेतकऱ्यांनी निवडला पुन्हा ‘तो’ पर्याय, फायदा की नुकसान..!
बडेजाव सर्जाचा, आख्खं गाव आलंय सेलिब्रेशनला, अल्पभूधारक शेतकऱ्याचं मोठं मन