fish farming : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ अन् दुहेरी उद्देशही साध्य, व्यवस्थापनावरच मत्स्यशेतीचे भवितव्य

शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकांचेच उत्पादन घेणे हा उद्देश राहिलेला नाही. काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून आता शेततळे जणूकाही अनिवार्यच झाले आहे असे चित्र आहे. शेततळ्याची गरज आणि याच गरजेतून उपलब्ध झालेले व्यवसाय शेतकऱ्यांना एक उभारी देणारे आहेत. त्यापैकीच मत्स्यव्यवसाय एक आहे. शेततळ्याची उभारणी केल्यानंत मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.

fish farming : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ अन् दुहेरी उद्देशही साध्य, व्यवस्थापनावरच मत्स्यशेतीचे भवितव्य
मत्स्यशेती Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 5:02 AM

मुंबई : शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकांचेच उत्पादन घेणे हा उद्देश राहिलेला नाही. काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून आता शेततळे जणूकाही अनिवार्यच झाले आहे असे चित्र आहे. (farm Ponds) शेततळ्याची गरज आणि याच गरजेतून उपलब्ध झालेले व्यवसाय शेतकऱ्यांना एक उभारी देणारे आहेत. त्यापैकीच (fisheries) मत्स्यव्यवसाय एक आहे. शेततळ्याची उभारणी केल्यानंत  (Fish Farming) मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदाससाठी त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मत्स्यपालन गोड्या पाण्यातील शेततळे मध्ये केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो.

अशी करा मत्स्य व्यवसयाची सुरवात

खत व्यवस्थापनानंतरच मत्स्य संवर्धन करणे शक्य होणार आहे. या प्रक्रियेनंतर 15 दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यासाठी साधारण 10 से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी 5 हजार याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावे लागणार आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता 3 ते 4 किंवा 6 प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे शक्य आहे.

मत्स्यपालनाचा असा हा फायदा

मत्स्यसंवर्धनाचा काळ हा 10 महिन्याचा असतो. दरम्यानच्या कालावधीत योग्य जोपासणा झाली तर माशाची वाढ ही 1 किलोपेक्षा अधिक होते. यामध्ये सर्वाध महत्वाची बाब म्हणजे शेततळ्यामध्ये बारमाही पाणी असणे गरजेचे असते. एवढेच नाही मत्स्यबीज हे चांगल्या दर्जाचे असणे गरजेचे आहे. सर्वकाही नियोजनबध्द झाले तर वर्षभराचा कालावधीत भरपूर नफा कमावता येतो. या व्यवसयामुळे शेततळ्यात पाणी कसे राहिल याची काळजी घेतली जाते त्यामुळे बारमाही शेततळ्यात पाणीही राहते.

या गोष्टीची घ्यावी लागणार काळजी

मत्स्यपालन करताना लहान बाबींचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये शेततळ्यासाठी पायऱ्या करणे महत्वाचे आहे जेणे करुन मासे काढणे सहज शक्य होणार आहे. याशिवाय तळ्यामध्ये खेकडे, वाम, बेडूक असे भक्षक प्राणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्लास्टिक कागद असणाऱ्या शेततळ्यामध्ये माशांची विष्ठा, माशांचे खाद्य त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे पाणी लवकर खराब होते ते बदलण्याची सोय करावी लागणार आहे. पावसाळ्यामध्ये शेततळे भरून जातात, अशा वेळी शेततळी ओव्हरफ्लो होऊन मासे वाहून जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे तर शेततळ्याचा कागद फाटला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Paddy Growers : धान उत्पादकांना बोनस की प्रति एकर मदत..! नियमितता साधण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा मधला मार्ग

Watermelon : कोरोनाचा प्रादुर्भाव नाही पण परिणाम कायम, भंडाऱ्यातून कलिंगडच गायब..!

Process Industry: प्रक्रिया उद्योगातून लातूरात सोयाबीनचे मार्केट वाढणार, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.