हिम्मत केली, धाडस दाखवलं, नव्या प्रयोगाने मालामाल केलं, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी लखपती!

पारंपारिक ऊसाच्या शेतीला फाटा देऊन फुलकोबी अर्थात फ्लॉवरची शेती केली आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं.

हिम्मत केली, धाडस दाखवलं, नव्या प्रयोगाने मालामाल केलं, तीन महिन्यात फ्लॉवर उत्पादक शेतकरी लखपती!
Niphad flower farming
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 3:41 PM

नाशिक : निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रयोग करुन कमाल केली आहे. पारंपारिक ऊसाच्या शेतीला फाटा देऊन फुलकोबी अर्थात फ्लॉवरची शेती केली आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. निफाड तालुक्यातील साखर कारखाने गेल्या पाच ते सात वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे गोदाकाठ परिसर गावातील शेतकऱ्यांनी उसाच्या पारंपारिक शेतीला फाटा देत फुलकोबी ( फ्लॉवर ) च्या शेतीकडे वळाले असून या शेतीतून चांगला फायदा होत आहे.

एक एकरात 16 हजार फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची लागवड केली. 80 पैसे दराने फुलकोबी (फ्लॉवर) च्या रोपांची खरेदी केली. 30 हजार रुपये खर्च करत ड्रीपच्या सहाय्याने फुलकोबीला पाणी दिले. मग दीड ते पावणे दोन महिन्यात फुलकोबीचे पीक हातात आले.

दीड लाख उत्पन्नाची अपेक्षा 

नाशिक मार्केटमध्ये फुलकोबीला मोठी मागणी आहे. एका फुलकोबीला (फ्लॉवर) किमान 15 रुपये दर मिळतो. आतापर्यंत एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र फुलकोबीतून दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. खर्च वजा जाता आजच्या बाजार भावानुसार 1 लाख रूपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

Niphad flower farming

Niphad flower farming

ऊस शेतीला फाटा

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. या पावसाचे पाणी आणि गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्यांच्या माध्यमातून निफाड तालुक्यात असलेल्या या तीन नद्यांच्या संगमावर ब्रिटिश कालीन बांधण्यात आलेले नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होते. मुबलक पाणी असल्याने गोदाकाठ परिसरातील गावंमध्ये ऊसाची शेती केली जात होती.

Niphad flower farming

Niphad flower farming

मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होत असल्याने निफाड तालुक्यात निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे साखर कारखाने बंद असल्याने ऊसाची विल्हेवाट लावणे जिकरीचे होऊन बसले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. भुसे, चापडगाव येथील शेतकऱ्यांनी फुलकोबीची (फ्लॉवर) शेती केली असून, यातून चांगला फायदा होत असल्याचे फुलकोबी उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

संबंधित बातम्या 

अर्धा जुलै संपला, तरीही पीक कर्ज वाटप रखडलं, बँकांनी हात आखडला!

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती

(Flower farming agriculture success story from Niphad nashik, Maharashtra )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.