Pune : लग्नांचा बार अन् फुलांचा बाजार, दोन वर्षांनी जुळला योग
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात बाजारपेठा तर बंद होत्याच शिवाय लग्न समारंभाला देखील मोजक्याच नारगिकांची उपस्थिती होती. त्यामुळे असे सार्वजनिक कार्यक्रम देखील दिमाखात होत नव्हते. परिणामी फुलांच्या मागणीत मोठी घट झाली होती. तर काळाच्या ओघात पुन्हा फुल लागवडीकडेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळात झेंडूच्या पिकाने शेतकऱ्यांना निराश केले होते. यंदा कुठे स्थिीत बदलत आहे.
पुणे : (Increase in income) उत्पन्न वाढीसाठी मुख्य पिकांबरोबर शेतकऱ्यांना इतर जोड व्यवसायांचाही आधार घ्यावा लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दरावरच (Seasonable Crop) हंगामी पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने फुलबाजार अक्षरश: उठला होतो. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले होते. यंदा मात्र, परस्थिती बदलत आहे. लग्नांचा बार पुन्हा दिमाखात उडत असल्याने (Marigold flower) झेंडूच्या फुलांचे देखील मार्केट वाढले आहे. लग्नसराई बरोबरच आता जत्रा आणि यात्रांचा सिझन सुरु झाला असून फुलांचा बाजार चांगलाच बहरला आहे. झेंडूच्या फुलांना सध्या 50 ते 60 रुपये किलो असा दर मिळत आहे.
दोन वर्षानंतर बदलले चित्र
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात बाजारपेठा तर बंद होत्याच शिवाय लग्न समारंभाला देखील मोजक्याच नारगिकांची उपस्थिती होती. त्यामुळे असे सार्वजनिक कार्यक्रम देखील दिमाखात होत नव्हते. परिणामी फुलांच्या मागणीत मोठी घट झाली होती. तर काळाच्या ओघात पुन्हा फुल लागवडीकडेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळात झेंडूच्या पिकाने शेतकऱ्यांना निराश केले होते. यंदा कुठे स्थिीत बदलत आहे. उत्पादन घटले असून आता मागणी वाढल्याने झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळत आहे.
झेंडूच्या दरात दुपटीने वाढ
शेतकऱ्यांचे अर्थकारण जेवढे उत्पादनावर अवलंबू आहे तेवढेच ते बाजारपेठेवर देखील. मध्यंतरी आवक मोठ्या प्रमाणात तर मागणीत घट अशी स्थिती होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचा वाहतूकीचा खर्चही निघणे मुश्किल झाले होते. पण आता उत्पादन तर घटले आहेच शिवाय लग्न समारंभासारखे कार्यक्रम मोठ्या दिमाखात होत आहेत. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी 20 ते 30 रुपये किलो असणारी झेंडूची फुले आता 60 रुपये किलोप्रमाणे विकली जात आहेत.
मागणी वाढली उत्पादन घटले
बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत आवक कमी असली तर दरात वाढ होते हे गणितच आहे. त्यानुसारच आता फुलांचे उत्पादन घटले आहे. दोन वर्षापासून ऐन हंगामात बाजारपेठा बंद राहिल्याने फुलांना कवडीमोल दर मिळाला. फुलांना दर नाही यामुळे फुलांचे उत्पादन घेतलेच जात नव्हते. त्यामुळे आता उत्पादनात घट झाली असून मागणी वाढली आहे. पुढच्या काळाही झेंडूचे बाजारभाव असेच टिकने गरजेचे आहे तेव्हाच झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.