Essential Commodities Act | जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल, कृषिमाल नियंत्रणमुक्त
जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आल्याने खाद्यतेल, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अन्नधान्याचा साठा करता येणार आहे. (FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)
नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) बदल करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. शेतकर्यांना चांगल्या किमती मिळवून देण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार धान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे यांच्यासह कृषी उत्पादने नियंत्रणमुक्त करण्यात येणार आहेत. थोडक्यात, शेतकऱ्यांना कृषिमालाचा साठा करण्यास मुभा मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना दिलासा देणारं वृत्त दिलं. (FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)
जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. त्यानुसार खाद्यतेल, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अन्नधान्याचा साठा करता येणार आहे. साठेबाजीबद्दल नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ अशा अपवादात्मक स्थितीतच विचारणा होणार असून गरज पडली तरच सरकार यात हस्तक्षेप करणार आहे.
शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. जिथे चांगला भाव, तिथे शेतमाल विकण्याची मुभा असेल. शेतकऱ्यांना परराज्यातही माल विकता येणार आहे. इतर उत्पादनांवरही मालविक्रीची बंधने नसतील.
जीवनावश्यक वस्तू कायदा कृषी क्षेत्राच्या वाढीस मोठा अडथळा मानला जात असे. कारण कधीही साठेबाजीची मर्यादा लागू होण्याच्या भीतीने व्यापारी अधिक खरेदी करण्यास घाबरत.
Government will amend Essential Commodities Act to enable better price realisation for farmers; Agriculture food stuffs including cereals, edible oils, oilseeds, pulses, onions and potato will be deregulated.#AatmaNirbharDesh #AatmanirbharBharat pic.twitter.com/qVfoVXVmZl
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 15, 2020
काय आहे जीवनावश्यक वस्तू कायदा?
(FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)
अत्यावश्यक वस्तूंचा कायदा 1955 च्या अधिनियमानुसार शासनाला अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन, वितरण, व्यापार व वाणिज्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश काढता येतात. केंद्र शासनाने तांदूळ, खाद्यतेल व खाद्यतेल बिया तसेच धानाच्या साठामर्यादेवर निर्बंध लागू केले आहेत.
12 फेब्रुवारी 2007 पासून सुधारित यादीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू
औषधे खते. (रासायनिक, अकार्बनी किंवा मिश्र यापैकी कोणतीही) अन्नसामुग्री (खाद्यतेल, बिया व तेल यांच्यासह) पूर्णतः कापसापासून तयार केलेला धागा. पेट्रोलियम व पेट्रोलजन्य पदार्थ. कच्चा ताग व तागाचे कापड. अन्न पिकांचे बियाणे तण आणि फळे भाजीपाल्याचे बियाणे. गुरांच्या वैरणाचे बियाणे. तागाचे बियाणे सरकी
(FM Nirmala Sitharaman announces reforms in Essential Commodities Act relief to farmers)