Sangli : झाले गेले विसरुन पुन्हा डाळिंब उत्पादक जोमात, रोगराईच्या तडाख्यातून वाचलेल्या बागांसाठी धडपड
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागांचे अस्तित्वच संपते की काय अशी स्थिती सांगलीसह सांगोला तालुक्यात झाली आहे. अवकाळीची अवकृपा आणि त्यानंतर 'पिन होल बोरर' आणि मर रोगामुळे डाळिंब बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. असे असाताना आता झाले गेले विसरुन डाळिंब उत्पादक शेतकरी पुन्हा मृग बहराची तयारी सुरु केली आहे. मृग बहर धरणाच्या पूर्वतयारीच्या कामाने वेग घेतला आहे.
सांगली : वातावरणातील बदलामुळे (Pomegranate Garden) डाळिंब बागांचे अस्तित्वच संपते की काय अशी स्थिती (Sangli) सांगलीसह सांगोला तालुक्यात झाली आहे. (Untimely Rain) अवकाळीची अवकृपा आणि त्यानंतर ‘पिन होल बोरर’ आणि मर रोगामुळे डाळिंब बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. असे असाताना आता झाले गेले विसरुन डाळिंब उत्पादक शेतकरी पुन्हा मृग बहराची तयारी सुरु केली आहे. मृग बहर धरणाच्या पूर्वतयारीच्या कामाने वेग घेतला आहे. त्याअनुशंगाने बाग छाटणी, पूर्व तयारीची फवारणी आणि खते घालण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. नुकसानीनंतर शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. त्यामुळे मुख्य हंगामातील नुकसान तर भरुन निघणार नाही पण उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा राहणार आहे.
अतिवृष्टी अन् त्यात रोगराईचा प्रादुर्भाव
सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि सांगोला तालुक्यात प्रामुख्याने डाळिंब बागा जोपासल्या जातात. शिवाय यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच या भागात सरासरीच्या तिप्पट पाऊस झाला होता. यामुळे नुकसान झालेच पण त्यानंतर वातावरणातील बदलामुळे डाळिंबला पिन होल बोरर आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बागा उबदारच आल्या नाहीत. उत्पादन सोडा बागांच नष्टच झाल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. यानंतर केंद्रीय पथकानेही बागांची पाहणी केली पण केवळ उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन झाले पण बंदोबस्ताबद्दल काहीच नाही. त्यामुळे भविष्यातही या रोगाचा प्रादुर्भाव वाढेल याची धास्ती शेतकऱ्यांना कायम आहे.
डाळिंब बागांमध्ये चाललंय काय?
किमान मृग बहरातील उत्पादन पदरी पडावे यासाठी शेतकरी प्रयत्न करु लागले आहेत. मृग बहर धरण्यापूर्वी बागांची हलक्या प्रकारची छाटणी करुन बोर्डो आणि 0-52-43 ची फवारणी कामे केली जात आहेत. खोड कीडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकांची पेस्ट झाडांच्या खोडांना लावली जात आहे. एवढेच नाही तर बागांची छाटणी कामे पूर्ण करुन अंतर्गत मशागत तसेच शेण आणि खते घालून बेड तयार करण्याचे काम केले जात आहे.
कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन
नुकासनीच्या दरम्यान नाही पण आता मृग धरण्यापूर्वी कृषी विभागाकडून डाळिंब उत्पादकांना मार्गदर्शन केले जात आहे. झाडांच्या खोडाला कीटकनाशकांची पेस्ट कशी लावायची इथपासून ते मृगामध्ये अधिक उत्पादन कसे घ्यावयाचे याचे मार्गदर्शन केले जात आहे. केंद्रीय पथकाकडून पाहणी त्यानंतर शेतकरी परिषद पार पडल्यानंतर आता कृषी विभागानेही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचाच विषय अजेंड्यावर घेतल्याचे चित्र आहे.
संबंधित बातम्या :
Kharif Season : सोयाबीन, कापसाचे उत्पादनही वाढणार अन् नुकसानही टळणार, राज्य सरकारचे धोरण काय?
Grape Export : उत्पादनात घट त्यात शेतीमाल निर्यातीच्या धोरणामुळे दुष्काळात तेरावा