Grape : पावसाळा तोंडावर तरीही द्राक्षाचे घड बागांवरच, निसर्गाचा लहरीपणा त्यात व्यापाऱ्यांची ‘खेळी’
हंगामाच्या अंतिम टप्प्यात काही भागांमध्ये द्राक्ष तोडणीला सुरवात झाली होती. मात्र, वातावरणामुळे द्राक्षाला दर्जा नाही असे म्हणत व्यापाऱ्यांनी कमी किंमतीमध्ये द्राक्षांची खरेदी शिवाय मागणीही अधिक नसल्याने व्यापाऱ्यांनी त्याची साठवणूक केली. आता मागणी असतानाही व्यापारी शेतकऱ्यांकडील माल खरेदी न करता साठवणूक केलेलेच द्राक्ष विक्री करीत आहेत.
अहमदनगर : हंगामाच्या सुरवातीपासून अडचणीत असलेला (Grape Farmer) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची व्यथा काही औरच आहे. अथक परीश्रम आणि निसर्गाशी दोन हात करुन (Vineyard) द्राक्ष बागा जोपासल्या तरीही संकटाची मालिका ही सुरुच आहे. आता पावसाळा तोंडावर असतानाही द्राक्षाचे घड हे बागांवरच आहे. द्राक्ष खरेदीसाठी (Traders) व्यापारीच फिरकले नाहीत. शिवाय खराब वातावरणामुळे बेदाणा बनवणेही शक्य झाले नाही. आता चवीला गोड असणारे द्राक्ष यंदा उत्पादकांनाच आंबट लागू लागले आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून संकटात असलेले द्राक्ष पीक शेवटपर्यंतही उबदार आलेच नाही. नगर जिल्ह्यातील एका द्राक्ष उत्पादकाचे तर 70 टन द्राक्ष ही जागेवर खराब होऊ लागली आहेत.
साडेतीन एकरातील बागेलाच द्राक्ष
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील राजेंद्र लोखंडे यांनी मोठ्या कष्टाने साडेतीन एकरामध्ये बाग उभी केली होती. पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने उत्पादन वाढेल असा आशावाद त्यांना होता. मात्र, हंगामाच्या सुरवातीला सुरु झालेला अवकाळी पाऊस हा शेवटपर्यंत कायम राहिला. त्यामुळे उत्पादनात घट तर झालीच शिवाय माल निकृष्ट दर्जाचा झाला आहे. आता द्राक्ष तोडणीला असताना व्यापारीच खरेदीसाठी फिरकत नाहीत. त्यामुळे बागेतच पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.
व्यापाऱ्यांकडून साठवणूक, शेतकऱ्यांचे नुकसान
हंगामाच्या अंतिम टप्प्यात काही भागांमध्ये द्राक्ष तोडणीला सुरवात झाली होती. मात्र, वातावरणामुळे द्राक्षाला दर्जा नाही असे म्हणत व्यापाऱ्यांनी कमी किंमतीमध्ये द्राक्षांची खरेदी शिवाय मागणीही अधिक नसल्याने व्यापाऱ्यांनी त्याची साठवणूक केली. आता मागणी असतानाही व्यापारी शेतकऱ्यांकडील माल खरेदी न करता साठवणूक केलेलेच द्राक्ष विक्री करीत आहेत. त्यामुळे आशा साठेबाजारांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
70 टन द्राक्ष बागेवरच
द्राक्ष हंगामाची सुरवात आणि शेवटही उत्पादकांसाठी आंबटच ठरला आहे. केवळ राजेंद्र लोखंडे हेच नाही यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचा माल अजून बागांनाच आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही ही अवस्था असल्याने आता द्राक्षाचे काहीच होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. राहाता तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र लोखंडे यांचे तर हाता-तोंडाशी आलेले 70 टन द्राक्षपीक जागेवरच खराब होत आहे. व्यापाऱ्यांकडून साठेबाजार आणि सरकारची अनास्था यामुळे ही वेळ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.