Ahmednagar : वर्षभरानंतर ‘एफआरपी’ प्रश्न मार्गी, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर सहसंचालकाचे कारखान्याला आदेश

2020 -21 मधील श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. प्रति टन 2 हजार 661 रुपयांपैकी 2 हजार 444 रुपये शेतकर्‍यांना ऑक्टोबर 2021 पर्यंत दिले होते. शिल्लक राहिलेले प्रती टन 217 रूपये कोणत्या कारणाने शेतकर्‍यांना दिले नाहीत यासाठी ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला. शेतकऱ्यांवर उघडच अन्याय होत असल्याचे निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Ahmednagar : वर्षभरानंतर 'एफआरपी' प्रश्न मार्गी, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे साखर सहसंचालकाचे कारखान्याला आदेश
साखर सहसंचालक मिलिंद भालेरावImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 2:52 PM

अहमदनगर :  (Sugarcane Sludge) ऊस गाळपाला लागूनच शब्द येतो तो म्हणजे एफआरपी रक्कम. (FRP) एफआरपीबाबत काही साखर कारखाने हे चोख भूमिका घेतात तर काहींकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे. सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्याकडे होती. या रकमेतील 63 लाख 79 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुनावणी दरम्यान दिले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

गतवर्षीच्या गाळप हंगामातील रक्कम होती बाकी

2020 -21 मधील श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. प्रति टन 2 हजार 661 रुपयांपैकी 2 हजार 444 रुपये शेतकर्‍यांना ऑक्टोबर 2021 पर्यंत दिले होते. शिल्लक राहिलेले प्रती टन 217 रूपये कोणत्या कारणाने शेतकर्‍यांना दिले नाहीत यासाठी ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला. शेतकऱ्यांवर उघडच अन्याय होत असल्याचे निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने केलेल्या सुनावणीचा परिणाम इतरत्रही होऊ शकतो.

63 लाख 79 हजार शेतकऱ्यांच्या हक्काचे

शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळायलाच हवे यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.साख आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रती टन 217 रुपये शेतकर्‍यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रादेशिक सह संचालकांनी कारखान्यास पत्र पाठवून 4 मे 2022 रोजी सुनावणी घेतली. यात बाकी राहिलेले 217 रुपयांपैकी प्रतिटन 9.08 रुपये शेतकर्‍यांना देण्याचा आदेश कारखान्यास दिला आहे. यामुळे एकूण बाकी 25 कोटी 37 लाख 46 हजार पैकी 63 लाख 79 हजार शेतकर्‍यांना मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

11 कारखान्यांची धुराडी बंद, 12 सुरु

जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांपैकी 11 कारखाने बंद झाले असून 12 कारखाने सुरु आहेत. तसेच यंदाच्या हंगामात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख मेट्रिक टन गाळप केलीये. तर 4 लाख 21 हजार मेट्रिक टन गाळप शिल्लक असून श्रीरामपूर तालुक्यात सर्वात जास्त शिल्लक आहेय. त्यामुळे या तालुक्यात हार्वेस्टिंगची संख्या वाढवली आहे. तसेच सध्या पावसाळा जवळ आल्याने ऊसतोड कामगार आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या ऊस तोडणीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहेय. त्यामुळे हार्वेस्टिंग वरच ऊस तोडणी अवलंबून आहेय. तर श्रीरामपूर मध्ये 40 हार्वेस्टर वाढवले असून जोपर्यंत उजळ पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू ठेवावे अशा आदेश साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.