Video: कलेक्टर साहेबांची साखऱ्यात भात रोवणी, ‘यांत्रिकीकरण स्वीकारा’, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना कानमंत्र
गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla) यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली.
गडचिरोली: जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla) यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यातील दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरूवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे,असे आवाहन शेतकऱ्यांना केले. (Gadchiroli Collector Deepak Singla cultivate Dhan in the farm at Sakhara appeal to farmers to follow modern method)
आधुनिक पद्धतीनं शेती करा
परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल असं दीपक सिंगला यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली भात(धान) रोवणी #गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरुवात केली आहे. साखरा गावात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करुन भात रोवणीला सुरुवात करण्यात आली.@mieknathshinde @DeepakSingla161 pic.twitter.com/uKPJ8CCogq
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) July 10, 2021
भात रोवणीला शुभारंभ
साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हा प्रमुख अधिकारी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
It was an amazing experience spending time with villagers in Sakhra village, Gadchiroli. Hope our food provider remains blissfull forever. @mieknathshinde @AUThackeray @CMOMaharashtra @NITIAayog @amitabhk87 https://t.co/3aAX2UYWh7
— Deepak Singla (@DeepakSingla161) July 10, 2021
शेतकऱ्यांची भात रोवणीसाठी लगबग
जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने आता धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले व शेतकरी यांनी यांत्रिकीकरण करून आधुनिक शेतीचा स्विकार करावा असे आवाहनही केले.
इतर बातम्या:
ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा
(Gadchiroli Collector Deepak Singla cultivate Dhan in the farm at Sakhara appeal to farmers to follow modern method)