Sugarcane : निर्यातीमुळे वाढला साखरेचा ‘गोडवा’ साखर उद्योगांना ‘अच्छे दिन’
निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा हंगामी पिकांवर झालेला असला तरी उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. याशिवाय क्षेत्र आणि साखरेचा उताराही वाढला आहे. त्यामुळेच यंदा उसाचे गाळप आणि साखरेचे विक्रमी उत्पादन मिळणार आहे. चालू हंगामात आतापर्यंत 95 लाख टन साखरेची निर्यात या विभागातून झाली आहे. शिवाय सध्याही ऊस गाळप हे सुरुच आहे. केवळ पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने हा बदल झाला आहे.
बारामती : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा हंगामी पिकांवर झालेला असला तरी (Sugarcane Production) उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. याशिवाय क्षेत्र आणि (Sugar) साखरेचा उताराही वाढला आहे. त्यामुळेच यंदा उसाचे गाळप आणि साखरेचे विक्रमी उत्पादन मिळणार आहे. चालू हंगामात आतापर्यंत 95 लाख टन साखरेची निर्यात या विभागातून झाली आहे. शिवाय सध्याही (Sugarcane Sludge) ऊस गाळप हे सुरुच आहे. केवळ पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने हा बदल झाला आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रात नाहीतर मराठवाड्यात देखील ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्येही साखरेचा उत्पन्नातील गोडवा वाढला आहे. शिवाय साखर उद्योगांनाही अच्छे दिन आले आहेत.
देशात 350 लाख टन साखरेचे उत्पादन
ऊस गाळपात 10 टक्के पेक्षा अधिक उतारा मिळाल्यानेही साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत देशात साखर कारखान्याच्या माध्यमातून 350 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हे विक्रमी उत्पादन असून अजूनही गाळप सुरुच आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कमी असले तरी आंतराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे देशातील साखर उद्योगांना त्याचा अधिकचा फायदा होत आहे. निर्यातीवर भर असल्यानेच साखर उद्योगांना अच्छे दिन आले आहेत.
निर्यात धोरणाचा फायदा उद्योजकांना
वाढीव शेतीमालाच्या उत्पादनाबरोबरच योग्य बाजारपेठही तेवढीच महत्वाची आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर टिकून असल्यानेच त्याचा फायदा देशातील प्रक्रिया उद्योजकांना होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच साखर निर्यातीला सुरवात झाली असल्याने यंदा निर्यातीचे उद्दीष्टापेक्षा अधिकची निर्यात होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळाला असून उत्पादन वाढूनही दरावर काही परिणाम नाही हीच शेतकऱ्यांसाठी मोठी बाब आहे.
तरीही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमच
यंदा ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन वाढले असले तरी विक्रमी क्षेत्रावर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ऊस हा फडातच उभा आहे. 12 महिन्याचा कालावधी संपूनही ऊसतोड न झाल्याने उत्पादनात घट होत आहे. शिवाय अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार की नाही असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Kharif Season : खरिपातील सोयाबीन बियाणाची चिंता मिटली, उन्हाळी बिजोत्पादन मात्र संकटात