Cotton Crop : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा आणखी किती वाढणार कापसाचा भाव

गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा लागवड क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज होता. केवळ विदर्भातच नाहीतर मराठवाड्यात पुन्हा कापूस लागवडी शेतकरी भर देणार असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. पण देशात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र हे 126 लाख हेक्टर असताना यंदा 124 लाख 50 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे. दर दुसरीकडे यंदाच्या हंगामात 370 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला होता.

Cotton Crop : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा आणखी किती वाढणार कापसाचा भाव
गतवर्षीप्रमाणेच यंदा कापसाला अधिकचा दर राहणार असल्याचा अंदाज आहे.
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 10:25 PM

मुंबई : गतवर्षी (Cotton Production) कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते. कधी नव्हे तो (Cotton Rate) कापसाला तब्बल 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. शिवाय हा दर कायम वर्षभर टिकूनही राहिला. यंदाही दरात अशीच वाढ राहणार असल्याचे चित्र आहे. देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरीच्या (Cotton Area) क्षेत्रावर देखील कापसाची लागवड झालेली नाही. तर दुसरीकडे कापूस उत्पादक देशांमध्ये दुष्काळजन्य परस्थिती असल्याने उत्पादनात घट निश्चित मानली जातेय. बाजारपेठेतील मागणी आणि आयातीत घट होणार असल्याने यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव राहणार हे निश्चित. या स्थितीचा सर्वाधिक फायदा भारतामधील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला असला तरी आता कापूस पीक जोमात आहे.

लागवडही घटली अन् क्षेत्रही

गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा लागवड क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज होता. केवळ विदर्भातच नाहीतर मराठवाड्यात पुन्हा कापूस लागवडी शेतकरी भर देणार असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. पण देशात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र हे 126 लाख हेक्टर असताना यंदा 124 लाख 50 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे. दर दुसरीकडे यंदाच्या हंगामात 370 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण घटत्या क्षेत्राबरोबर कापसाचे उत्पादनही 345 लाख गाठींपर्यंतच जाईल असा अंदाज आहे. घटलेले उत्पादन आणि मागणीत राहणारी वाढ हे भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

अमेरिकेत उत्पादन घटले, फायदा भारतीयांना

भारतामधील काही राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी अमेरिकेत परस्थिती ही वेगळी आहे. अमेरिकेत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकेत 25 लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कापसाची गाठ ही 170 किलोची असते. इतर देशांमध्ये उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्याचा फायदा भारतीय व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील होणार आहे. बाजारसमित्यांमध्ये आताच कापसाला 10 हजार 300 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा काय राहिल चित्र..!

कापसाच्या बाबतीत अमेरिका हा सर्वात मोठा निर्यातदार आहे. या एकट्या देशात 2 कोटी 50 लाख गाठींचे सरासरी उत्पादन होत असते. टेक्सास, कॅलिफोर्निया या राज्यामध्येचे अधिकचे उत्पादन असते. यंदा मात्र, दुष्काळाच्या झळा या दोन राज्यालाच अधिकच्या असल्याने थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे निर्यातीमध्ये आघाडीवर असलेले अमेरिका राष्ट्र यंदा पिछाडीवर राहणार. तर भारत देशाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम या देशांना भारताकडून निर्यात होणार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत वजन आणि वाढीव दरही असा दुहेरी फायदा भारताला होणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.