नवी दिल्ली : देशात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे (Farmer)चांगलेचं नुकसान केले आहे. देशात अनेक राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. यावर्षी पिकांची इतकी नासाडी झाली आहे की, धान्य खराब झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अजून शक्यता आहे. पण असं असताना उत्तर प्रदेश (uttar pradesh) सरकारने शेतकऱ्यांकडे असणारा खराब गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकार आतापर्यंत 6 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झालेले धान्य खरेदी करीत नव्हतं. परंतु यंदा शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झाल्यामुळे सरकारने त्यात थोडासा बदल केला असून प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने देखील उत्तरप्रदेशच्या अन्न आणि पुरवठा विभागाकडून परवानगी मिळवली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
2125 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीवर गहू विकला जात आहे. सरकारच्या सुचनेनुसार 6 टक्क्यांपर्यंत गहू खराब झाला असल्यास कसल्याही दरात कसल्याची प्रकारची कपात केली जाणार नाही. परंतु 6 ते 8 टक्क्यांपर्यंत गहू खराब झाला असल्यास 5.31 रुपये प्रति क्विंटल इतके पैसे कापले जाणार आहेत. 8 ते 10 टक्क्यांपर्यंत खराब झालेला गहू असल्यास 10.62 रुपये प्रति क्विंटल पैसे कापले जाणार आहेत. 10 ते 12 टक्के दराने 15.93 रुपये प्रति क्विंटल पैसे कापण्यात येतील , 12 ते 14 टक्के दराने 21.25 रुपये प्रति क्विंटल पैसे कापण्यात येतील, 14 ते 16 टक्के दराने 26.56 रुपये प्रति क्विंटल आणि 26.55 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 16-18 टक्के आणि कमी केल्यावर 31.87 रुपये प्रति क्विंटल दराने कपात केली जाणार आहे.
महाराष्ट्रात सुध्दा अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही हवामान बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे.