आनंदवार्ता, तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्यात, आता काय भाव पटकन वाचा

Turdal Price Reduce Pulses Rate Down : गेल्या तीन-चार वर्षात कडधान्यापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच महागले आहेत. तुरीचे भाव गडगडल्याने आता तूरडाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर इतर डाळींच्या किंमती पण कमी होण्याची शक्यता आहे.

आनंदवार्ता, तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्यात, आता काय भाव पटकन वाचा
तुरडाळीसह इतर डाळी होणार स्वस्त
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 2:47 PM

गेल्या तीन-चार वर्षात कडधान्यापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच महागले आहेत. तुरीचे भाव गडगडल्याने आता तूरडाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर इतर डाळींच्या किंमती पण कमी होण्याची शक्यता आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरीचे दर घसरले आहेत. साडेतेरा हजार प्रति क्विंटल इतका दर झाला आहे. त्यामुळे आता तूरडाळीचे दर देखील कमी होत आहेत. जवळपास 40 रुपये इतका दर तूरडाळ मध्ये कमी झाला आहे. यामुळे तूर डाळीचे गगनाला भिडलेले दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत.

तूरडाळ किलोमागे 40 रुपयांनी कमी

मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यतेने सांगलीतील ठोक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे 40 रुपयांनी उतरले आहेत. तूरडाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत. नवीन हंगामातील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

सांगलीच्या बाजारात तूरडाळीचा दर क्विंटलला 13 हजार 500 रुपये होता. पंधरा दिवसांपूर्वी याच तूरडाळीचा दर क्विंटलला 17 हजार 500 रुपये होता. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर किलोला 190 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता 150 रुपयांपर्यंत उतरले आहेत. तर ऐन दसरा-दिवाळीमध्ये हरभरा डाळीचे दर 110 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.

अद्याप नवीन हंगामातील हरभरा बाजारात येण्यापूर्वीच हरभरा डाळीचे दर 20 रुपयांनी खाली आले आहेत. मसूर डाळीचे दर किलोला 90 रुपये स्थिर असले तरी मूगडाळीचे दर मात्र किलोला 10 ते 15 रुपये उतरले आहेत.

तुरीचे विक्रमी पीक

नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या प्रांतात तुरीचे विक्रमी पीक आले आहे. देशांतर्गत तुरीची मागणी 42 लाख टनांची आहे. यंदा तेवढे उत्पादन देशांतर्गतच होण्याची शक्यता आहे. शिवाय बाहेरील देशांतून सुमारे 10 लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत. यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे.

हमाल -मापाडी संघटनेचा संप

तोलाईची रक्कम वाढवून द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील हमाल -मापाडी संघटनेने संप पुकारला आहे. जोपर्यंत तोलाईची रक्कम वाढवून देत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असा इशारा हमाल मापाडी संघटनेकडून देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुमारे पंधराशे हमाल मापाडी या संपात सहभागी झाले आहेत. हमाल मापारी संघटनेने पुकारलेल्या या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे व्यवहार थांबलेले आहेत.

ई-पीकची मुदत संपली, शेतकरी चिंतेत

केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील पिक पाहणीची मुदत काल संपली. जिल्ह्यामध्ये केवळ 12 टक्के क्षेत्रावर पेऱ्याची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या नंतर आता शेतकर्‍यांना तलाठी कार्यालयाकडे चक्रा माराव्या लागणार आहेत. ई पीक पाहणी शिवाय कोणतीही मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना आता ती पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.