Agricultural News : चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिकाला फायदा, कोरड्या चाऱ्याचे दर वाढले
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात चांगला पाऊस (heavy rain) झाला असला तरी पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. असं असलं तरी कोरडा चारा मिळणं कठीण झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध आहे. मात्र तो चारा जनावरांना कायम खाऊ घालता येत नाही. त्यामुळे थोडा कोरडा चारा जनावरांना लागतो. मात्र कोरड्या चाऱ्याचे भाव गग्नाला भिडले आहेत. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची मोठी अडचण पाहायला मिळते. यावेळी शेतकऱ्यांना (dhule farmer) कोरडा चारा मिळत नसल्यामुळे मोठी अडचण झाली आहे.
रब्बी पिकांना त्याचा फायदा झाला
धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिकांना त्याचा फायदा झाला. शेतात हिरवा चारा देखील उपलब्ध आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी हिरव्या चाऱ्याची जिल्ह्यात टंचाई नाही. मात्र असे असताना कोरडा चारा मात्र भेटत नाही. कोरड्या चाऱ्याचे भाव तीन हजार रुपये शेकडा पेंढी झाले आहे. तेही जिल्ह्यात भेटत नाही. कोरडा चारा हा थेट गुजरात येथील बुरुज येथून आणावा लागतो. त्यामुळे जनावरांना उन्हाळ्यात काय खाऊ घालावे घालावे असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.
दिवसभर हिरवा चाराच खाऊ घालता येत नाही
एकीकडे उत्पादन केलेल्या शेती पिकांना भाव नाही. दुसरीकडे शेती शेतीसाठी लागणाऱ्या जनावरांना चारा नाही त्यामुळे करावं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. गारपिटीमुळे हिरवा चारा देखील खराब झाला आहे. तो ही कमीच आहे, जनावरांना दिवसभर हिरवा चाराच खाऊ घालता येत नाही. थोड्या प्रमाणात कोरडाचारा देखील द्यावा लागतो. मात्र तो चारा भेटत नसल्याने टंचाई निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने काहीतरी उपाय करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर कापडीला आलेल्या पीकांना सुध्दा पावसाचा फटका बसला आहे.