माजी विद्यार्थीच बनला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु; डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील( Dr. Prashantkumar Patil) यांची नियुक्ती केली आहे
अहमदनगर: जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील(Dr. Prashantkumar Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही नियुक्ती केली. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती 5 वर्षांच्या काळासाठी करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. (Governor Bhagatsingh Koshyari appointed Dr. Prashantkumar Patil as Vice Chancellor of Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri)
डॉ. प्रशांतकुमार पाटील कोण आहेत?
डॉ.प्रशांतकुमार पाटील हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.
पाच वर्षांसाठी नियुक्ती
डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 27 फेब्रुवारी) पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ कार्यकाळ संपल्यानंतर सेवानिवृत्त झाले. डॉ. विश्वनाथ यांचा कार्यकाळ 4 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांच्या आदेशानं समिती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे या समितीचे सदस्य होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं 10 जिल्हयात कार्यक्षेत्र
सध्या महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली. सध्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदुरबार, धुळे , नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेले आहे.
ठिबक सिंचन प्रचार प्रसाराद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणाऱ्या भवरलाल जैन यांच्या पोर्ट्रेटची गिनीज बुकमध्ये नोंदhttps://t.co/SqXh1WgTJv#jain | #bhavarlaljain | #Jalgaon | #agriculture
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान- जयंत पाटील
पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला
(Governor Bhagatsingh Koshyari appointed Dr. Prashantkumar Patil as Vice Chancellor of Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri)