Grain Sieve : धान्य चाळणी एक कामे अनेक, शेतीमालाची प्रतवारी अन् योग्य दरही

शेतीमालाची काढणी, मळणी आणि थेट विक्रीसाठी बाजारपेठ असेच काय ते शेतकऱ्यांचे नियोजन असते. मात्र, शेतीमालाची योग्य प्रतवारी न केल्यामुळे कमी दर मिळतो. अगदी क्षुल्लक बाबींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्यावतीने कराड येथे महामंडळाच्या गोडाऊनमध्ये 5 मेट्रीक टन प्रतितास चाळण होईल या क्षमतेची धान्य चाळणी उपलब्ध करण्यात आली आहे.

Grain Sieve : धान्य चाळणी एक कामे अनेक, शेतीमालाची प्रतवारी अन् योग्य दरही
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 3:40 PM

कराड : शेतीमालाची काढणी, मळणी आणि थेट विक्रीसाठी बाजारपेठ असेच काय ते शेतकऱ्यांचे नियोजन असते. मात्र, (Agricultural Goods) शेतीमालाची योग्य (Category) प्रतवारी न केल्यामुळे कमी दर मिळतो. अगदी क्षुल्लक बाबींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र राज्य (Warehousing Corporation) वखार महामंडळाच्यावतीने कराड येथे महामंडळाच्या गोडाऊनमध्ये 5 मेट्रीक टन प्रतितास चाळण होईल या क्षमतेची धान्य चाळणी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार आहे. कोणत्याही धान्याची चाळणी करता येणार आहे. यापूर्वी शेतीमाल तारण योजनेच्या माध्यमातून वखार महामंडळाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. आता कारभारात तत्परता निर्माण व्हावी म्हणून ही सोय उपलब्ध करण्यात आली असून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आता शेतीमाल दाखल केला की थेट विक्री न करता शेतकऱ्यांना त्याची प्रतवारी करता येणार आहे.

1 तासामध्ये 5 मेट्रीक टन धान्याची चाळणी

शेतीव्यवसयात उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दराला अधिकचे महत्व आहे. शिवाय बाजारपेठेत दाखल होणार शेतीमाल देखील योग्य दर्जाचा असेल तरच त्यास चांगला दर मिळतो. मात्र, धान्याच्या प्रतवारीकडेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. मात्र, कराड येथील वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये 1 तासाला 5 मेट्रीक टन धान्याची चाळणी आणि प्रतवारी ठरवता येणार आहे. कमी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया क्षुल्लक असली तरी त्याचा शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.प्रतवारीनुसारच शेतीमालाला दर मिळतो. हीच बाब लक्षात घेऊन धान्य चाळणी उभारण्यात आली आहे. नाममात्र शुल्क आकारुन शेतकऱ्यांची ही सोय करण्यात आली आहे.

यंत्राच्या माध्यमातून नेमके काय होणार?

वखार महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेली धान्य चाळणी असली तरी धान्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये ग्रेडींग केली जाते. अन्यथा शेतीमाल चांगला नाही असे कारण सांगत कवडीमोल दर दिला जातो. मात्र, हे यंत्र शेतकऱ्यांना तर उपयोगी पडणारच आहे पण व्यापाऱ्यांनीही याचा लाभ घेण्याचे अवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. शेतीमालाचा दर्जा तर सुधारेलच पण या सोयीमुळे शेतकऱ्यांचाही आर्थिक दर्जा सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Poultry : पोल्ट्री फार्मर्सचे थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र..! पत्रास कारण की,

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम

Mango : जीआय मानांकन हापूसला हक्काचे मार्केट, खरेदी केंद्राची उभारणी अन् विक्रीही

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.