कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादकांना झटका, निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची केंद्राकडे हाक

द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोरोनामुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. Grapes Farmers Corona Virus

कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादकांना झटका, निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची केंद्राकडे हाक
द्राक्ष
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 3:32 PM

नाशिक: द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर होत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना मिळणाऱ्या पैशातून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांनी बेदाणे केले असता त्यालाही मागणी आणि बाजार नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात आलेत. कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. (Grapes Farmers facing problems due to corona virus)

कोरोना लॉकडाऊनमुळे निर्यातीवर परिणाम

2020 मध्ये कोरोनामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची मागणी घटली होती. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्षाचे बेदाणे करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावात वाढ झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची मागणी घटलीय. व्यापाऱ्यांकडून द्राक्षांना मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

तीन हजार टन बेदाणे पडून

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील द्राक्षांचे बेदाणे करण्याचा मार्ग स्वीकारला होता. यातून काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या बेदाण्यापैकी तीन हजार टनांहून अधिक बेदाणे नाशिक जिल्ह्यात पडून आहेत. यंदाही बेदाण्यांना मागणी नसल्यामुळे आणि बाजार भाव नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. द्राक्षांवर लाखो रुपये खर्च करून हाती काही येत नसल्याने केंद्र सरकारने लक्ष देऊन भरघोस मदत द्यावी, अशी मागणी आता खामगाव बुद्रुकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप गारे यांनी केलीय.

द्राक्ष निर्यातीवरील अनुदान बंद शेतकऱ्यांना दुहेरी फटका

मागच्या वर्षी कोरोना काळात केलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपले द्राक्ष निर्यात करता आले नाही. त्यामुळे त्यांना ते द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत कवडी मोल किमतीत विकावे लागले होती. यंदाच्या वर्षी तरी या द्राक्ष उत्पादकांना दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती होती. ऐन निर्याती वेळेस केंद्र सरकारने निर्यातीवर सुरू असलेले अनुदान बंद केल्याने द्राक्ष दर घसरले आहेत.

संबंधित बातम्या :

द्राक्ष पंढरीतील शेतकरी आक्रमक,निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची मागणी

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

(Grapes Farmers facing problems due to corona virus)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.