Grape : वेलीवरील द्राक्ष आता बांधावर, गतवर्षीच्या वातावरणाचा परिणाम यंदाच्या बागांवर
शेतात द्राक्षाची बाग म्हणजे सधन शेतकरी अशीच काहीशी ओळख द्राक्ष उत्पादकांची झालेली. मात्र, गेल्या 4 वर्षामध्ये हे चित्र बदलत आहे. लागवडीपासून अमाप खर्च आणि आता वातावरणातील बदलाचा परिणाम यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च होत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम तर झालाच होता. पण गतवर्षी द्राक्ष उत्पादकांना सावरण्याची संधा मिळाली होती.
पंढरपूर : वातावरणातील बदलाचा परिणाम हा पीक काढणीपर्यंतच मर्यादित राहतो असे नाही तर याचे किती दुरगामी परिणाम होतात याचा प्रत्यय (Grape) द्राक्ष उत्पादकांना येत आहे. (Climate Change) खराब वातावरणामुळे ऑक्टोंबर महिन्यात (Vineyard) बाग छाटणीला उशिर झाला. त्यामुळे बहार लांबणीवर पडला. यामुळे शेतकऱ्यांनीही बहार उशिरानेच धरला. बागांवर क्षमतेपेक्षा वाढलेला माल, वाढलेले तापमान आणि फळमाशीचा वाढता उपद्रव यामुळे द्राक्षांची गुणवत्ता घसरली आणि ज्याची भिती होते तेच झाले. या सर्व प्रक्रियेमुळे जून महिना तोंडावर आला असतानाही द्राक्ष ही बागांवरच आहेत. यामुळे पुढील हंगामात द्राक्ष लागवडीवर परिणाम होईल म्हणून उत्पादक द्राक्षांची छाटणी करुन थेट बांधावर टाकत आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणाच्या झळा द्राक्ष उत्पादक शेतकरी अद्यापही सहन करीत आहे.
नुकसानीची तीन वर्ष
शेतात द्राक्षाची बाग म्हणजे सधन शेतकरी अशीच काहीशी ओळख द्राक्ष उत्पादकांची झालेली. मात्र, गेल्या 4 वर्षामध्ये हे चित्र बदलत आहे. लागवडीपासून अमाप खर्च आणि आता वातावरणातील बदलाचा परिणाम यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च होत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम तर झालाच होता. पण गतवर्षी द्राक्ष उत्पादकांना सावरण्याची संधा मिळाली होती. पण ऐन हंगाम सुरु होत असतानाच अवकाळीची अवकृपा होण्यास सुरवात झाली ती हंगाम संपेपर्यंत ती कायम राहिली. त्यामुळे दोन वर्ष कोरोनामुळे आणि गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
आंबा बाजारात येताच दरावर परिणाम
एकीकडे उत्पादनात घट होत असताना चांगला दर मिळाला असता तरी द्राक्ष उत्पादक शेतकरी हे सावरले असते. मात्र, वावरात जी अवस्था तीच बाजारपेठेत. संपूर्ण हंगामात एकदाही द्राक्षाला विक्रमी दर मिळाला असे चित्र झाले नाही. उलट दरवर्षी मे महिन्यात अधिकची मागणी असल्याने चांगला दर मिळत असतो पण यंदा द्राक्षाला मागणी सुरु होताच फळांचा राजा अर्थात आंब्याचे आगमन झाले. त्यामुळे केवळ द्राक्ष विक्रीवरच नाहीतर कलिंगड विक्रीवरही त्याचा परिणाम झाला होता. अधिकच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी केलेला प्रयोगही फसला.
द्राक्ष छाटणी करुन बांधावर पसरण
शेतकऱ्यांनी अधिकचा दर मिळेल या भावनेतून उशिरा बहर धरला. दरवर्षी मे महिन्यात द्राक्षाला चांगली मागणी असते म्हणून शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला. मात्र, व्यापाऱ्यांकडून मागणीच झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांनीच बाजारपेठेचा शोध घेत सामूहिकरित्या द्राक्ष विक्रीचा प्रयत्न केला पण तो देखील फसला. अनेक शेतकऱ्यांचा तर वाहतूकीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे आता याच द्राक्षांचा परिणाम आगामी हंगामावर होऊ नये म्हणून द्राक्ष छाटणी करुन थेट बांधावर टाकले जात आहेत.