Guidance to farmers : शेतकऱ्यांसाठी चालतं-फिरतं विद्यापीठ, कृषी सल्ल्यातून बदलले शेतकऱ्यांचे जीवनमान

बोटावर मोजण्या एवढेच शेतकरी हे पीक पध्दतीबाबत मार्गदर्शन घेत आहे. मात्र, जर एखादा कृषी सहाय्यक बांधावर येऊन पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करीत असेल तर. अवाक् झालात ना..पण हे खरे आहे.. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एक अवलिया शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादन वाढीचे धडे देत आहेत.

Guidance to farmers : शेतकऱ्यांसाठी चालतं-फिरतं विद्यापीठ, कृषी सल्ल्यातून बदलले शेतकऱ्यांचे जीवनमान
कृषी सहायक के.जी. शाहीर हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 7:02 AM

लातूर : (Farming) शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आणि देशाचा मुख्य व्यवसाय असला तरी आजही मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. काळाच्या ओघात म्हणण्यापुरता व्यवसयात बदल झाला आहे. पण आजही योग्य दिशा मिळत नसल्याने उत्पादनात घट आणि उत्पन्नपेक्षा नुकसानच अधिक अशी आवस्था पाहवयास मिळत आहे. बोटावर मोजण्या एवढेच शेतकरी हे पीक पध्दतीबाबत (Guidance to farmers) मार्गदर्शन घेत आहे. मात्र, जर एखादा कृषी सहाय्यक बांधावर येऊन पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करीत असेल तर. अवाक् झालात ना..पण हे खरे आहे.. (Latur) लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एक अवलिया शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादन वाढीचे धडे देत आहेत. आतापर्यंत दीड दशकात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केल्याने उत्पादनात तर वाढ झाली आहे. शिवाय पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने जमिनीचा पोतही सुधारला आहे.

अनोख्या उपक्रमाचे रहस्य काय?

वातावरणातील बदल, दुष्काळ अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे वास्तव रेणापूर येथील के.जी. शाहीर यांच्या लक्षात आले. शिवाय कृषी मध्येच शिक्षण घेतल्याने त्यांना याची अधिक तीव्रतेने जाणीव झाली. त्यामुळे अल्पभूधारक असलेल्या शाहीर यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्धार केला होता. गेल्या 15 वर्षात त्यांनी जवळपास 10 हजारहून अधिक शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे उत्पादन वाढवले आहे. लातूरसह लगतच्या बीड जिल्ह्यातील गेवराई, केज, धारुर या भागातील शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांसाठी के.जी. शाहीर हे सकाळी 7 पासून ते रात्री उशीरापर्यंत उपलब्ध राहतात. शेतकी विभागात पदवी घेऊन त्यांनी हा शेतकरी हीताचा वसा उचलला होता तो आजही कायम आहे.

नेमके कशाप्रकारचे होते मार्गदर्शन?

शेतकऱ्यांना पीक निवड, जलनियोजन, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण अशा बाबींची माहिती दिली. सन 2008 मध्ये रानडे अॅग्रो, पुणेच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यात काम सुरु केले. जिल्ह्यात सातत्याने अवर्षणाची स्थिती. नगदी पीक म्हणून इथले शेतकरी कपाशीवर अवलंबून. शाहीर यांनी सुरुवातीच्या काळात कपाशीचे उत्पादन अधिक वाढावे, यासाठी शास्त्रीय पध्दतीने शेतकऱ्यांना माहिती देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मोसंबी, आंबा, टरबूज व इतर फळपिके शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी पाठपुरावा केला. जलव्यवस्थापन कसे केले पाहिजे, बहार केव्हा घ्यायला हवा, आंतर पीक कुठले घेता येईल, कीड नियंत्रण कसे करायचे अशा ना-न प्रश्नांची उत्तरे ते शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देतात.

सुरु केलेल्या उपक्रमाचा उद्देश साध्य..

केवळ शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम 15 वर्षापूर्वी सुरु केला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात तर वाढ झाली आहे शिवाय मराठवाडा सारख्या आवर्षण ग्रस्त भागात देखील फळबागांचे क्षेत्र वाढलेले आहे. जे शेतकरी उत्पादनवाढीसाठी इच्छूक आहेत किंवा ज्यांना या मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते अशा शेतकऱ्यांमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. अनेक शेतकरी संपर्कात आले प्रत्येकानेच हा बदल स्विकारला असे नाही पण अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि पीक पध्दतीमध्ये बदल झाला यातच हा उपक्रम सार्थक झाल्याचे के.जी.शाहीर यांनी टीव्ही9 मराठी शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या :

Beed : अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भरला आठवडी बाजार, भाजीपालाही मोफत

Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले आवकमध्ये चढ-उतार, शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला..!

राज्य सरकारची भन्नाट योजना : प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढणार फळबागेचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाचे नियोजन?

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.