Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?

महिन्याकाठी होत असलेला अवकाळी पाऊस आणि आता उष्णतेची लाट हे सर्वकाही आंबा उत्पादकांसाठी नुकासनीचे ठरत आहे. हापूसच्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा 15 एप्रिलपासून मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आंबा खवय्यांसाठी हापूसची मनसोक्त चव चाखण्यासाठी अणखी 10 दिवासांची वाट पहावी लागणार आहे.

Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 12:00 PM

रत्नागिरी : महिन्याकाठी होत असलेला (Untimely Rain) अवकाळी पाऊस आणि आता उष्णतेची लाट हे सर्वकाही आंबा उत्पादकांसाठी नुकासनीचे ठरत आहे. (Hapus Mango) हापूसच्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा 15 एप्रिलपासून मुबलक प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आंबा खवय्यांसाठी हापूसची मनसोक्त चव चाखण्यासाठी अणखी 10 दिवासांची वाट पहावी लागणार आहे. कारण सध्या (Maharashtra) राज्यातील मुख्य बाजारपेठेत फळांच्या राजाचे आगमन झाले असले उत्पादन घटल्याने आवक ही कमीच आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात हापूस आंबा सर्वच बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे हापूस बाहेरून भाजत असून आतून तो पांढरा होण्याची भीती आहे. मात्र, सध्या अल्प प्रमाणात आवक असल्याने दर हे चढेच आहेत. 25 एप्रिलनंतरच आवक मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे.

पहिल्या बहरापासूनच हापूसवर अवकाळीची अवकृपा

यंदा फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंब्याला मोहर लागला होता. च्याच दरम्यान काही प्रमाणात फळंही लागली मात्र, अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईत सापडून गळून गेली. तेव्हापासून सुरु झालेली अवकाळीची अवकृपा सध्याही कायम आहे. मध्यंतरीच झालेल्या पावसामुळे आंबागळ तर झालीच पण न भरुन निघणारे फळबागायत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता 15 एप्रिल पासून मुबलक प्रमाणात आंबा बाजारपेठेत उपलब्ध होणार होता पण अवकाळीनंतर उन्हाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे आंब्याच्या दर्जावर त्याचा परिणाम झाला आहे. आता 25 एप्रिल नंतर आवक वाढेल असा अंदाज आहे.

आवक स्थिर असल्याने दरात वाढ

सध्याही वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक होत आहे. मात्र, कमी प्रमाणात आवक होत असून सध्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे आहेत. गेल्या दीड महिन्यापासू हापूसची आवक सुरु झाली आहे पण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दर वाढलेले आहेत. अजून 10 दिवस असेच दर राहतील. मे च्या पहिल्या आठवड्यापासून दरात काही प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे.

सध्या काय आहेत हापूस आंब्याचे दर?

कोकणातून वाशीसह इतर मुख्य बाजारपेठांमध्ये हापूस दाखल होत आहे. पण मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी आहे. दरवर्षी गुढीपाडव्यापर्यंत वाशी मार्केटमध्ये 1 लाखाहून अधिक पेट्यांची आवक होत असते यंदा मात्र, आतापर्यंत 20 हजार पेट्याच कोकणातून जात आहेत. 5 डझन पेटीचा दर हा 5 हजार रुपये आहे. त्यामुळे 10 दिवस थांबूनच सर्वसामान्यांना हापूसची चव चाखावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop: उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय? शेतकऱ्यांचा उद्देश होणार का साध्य?

Nashik : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, कारखान्याची टाळाटाळ अन् महावितरणच्या मनमानीचा शिकार ठरतोय शेतकरी

Turmeric Crop: अवकाळीच्या धास्तीने रखरखत्या उन्हात जगाचा पोशिंदा राबतोय, हळदीच्या विक्रमी दरासाठी धडपडतोय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.