Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला
निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आंबा उत्पादकांचे झाले आहे. असे असताना फळबाग लागवडीमध्ये यंदाही आंब्यानेच आघाडी घेतली आहे. केवळ कोकण भागातच नाही तर आता राज्यभर हापूस आंब्याच्या कलमांना मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रोपवाटिकांना योग्य असे नियोजन करावे लागणार आहे.
रत्नागिरी : निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा (Orchard) फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे (Mango Production) आंबा उत्पादकांचे झाले आहे. असे असताना फळबाग लागवडीमध्ये यंदाही आंब्यानेच आघाडी घेतली आहे. केवळ (Kokan) कोकण भागातच नाही तर आता राज्यभर हापूस आंब्याच्या कलमांना मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रोपवाटिकांना योग्य असे नियोजन करावे लागणार आहे. या भागात हापूससह विविध प्रकारच्या आंबा कलमाची ‘मनरेगा’ च्या माध्यमातून लागवड केली जाते. गतवर्षी मागणीनुसार पुरवठा झाला नव्हता त्यामुळे यंदाचे रोपे कमी पडू नये यासाठी रोपवाटिकाधारकांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
रोप तयार करण्याबाबत रोपवाटिकांना सूचना
निसर्गाचा लहरीपणा असला तरी दिवसेंदिवस फळबागाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शेतकरी शाश्वत उत्पादनावर भर देत आहे. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान हे होतेच. असे असतानाही यंदा आंबा आणि काजू लागवडीच्या क्षेत्राच वाढ होणार आहे. आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात रोपांची मागणी होते. त्यानुसार रत्नागिरीतील खासगी आणि शासकीय रोपवाटिकांनी दर्जेदार कलम तयार करण्यावर भर देण्याच्या सूचना फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी दिल्या आहेत.
कृषी विद्यापीठाचीही महत्वाची भूमिका
आंबा कलम उपलब्ध करुन देण्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचीही महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाने अपेक्षित रोपांची मागणीची माहिती ही रोपवाटिकाधारकांना देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने चार वर्षापूर्वी तयार केलेल्या रोपांना म्हणावा तसा उठाव झाला नव्हता. त्यामुळे रोपवाटिकाधारकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांची लेखी यादी दिली तर ते अधिक सोईस्कर होईल अशी मागणी रोपवाटिकाधारक करीत आहेत.
रोपवाटिकांधारकांच्या काय आहेत मागण्या?
ज्याप्रमाणे बदलत्या वातावरणामुळे फळबागांचे नुकसान होते अगदी त्याचप्रमाणे रोपवाटिकांचे. त्यामुळे काजू बीला हमीभाव देण्यात यावा, उत्पादन खर्च प्रती किलो 40-50 मिळावा, परदेशातील काजू कमी किंमतीमध्ये उपलब्ध करुन द्यावा, इनपूट ड्यूटी वाढवून द्यावी एवढेच नाही तर प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी रोपवाटिकांनी केली आहे.