Turmeric Crop: अवकाळीच्या धास्तीने रखरखत्या उन्हात जगाचा पोशिंदा राबतोय, हळदीच्या विक्रमी दरासाठी धडपडतोय
शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावरच अवलंबून आहे. केवळ पेरणी आणि उत्पादनात कमी-अधिक इथपर्यंतच निसर्गाचा रोल राहिला नाही तर आता पिक काढणीचे नियोजनही निसर्गावरच ठरत आहे. सध्या शेत शिवारात उन्हाच्या झळा वाढत आहेत. यातच हळद काढणीला आली आहे. शिवाय 20 एप्रिलपर्यंत हळद काढणीसाठी बळीराजा प्रयत्नांची पराकष्टा सुरु आहे.
नांदेड : शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावरच अवलंबून आहे. केवळ पेरणी आणि उत्पादनात कमी-अधिक इथपर्यंतच निसर्गाचा रोल राहिला नाही तर आता पिक काढणीचे नियोजनही निसर्गावरच ठरत आहे. सध्या शेत शिवारात (Summer) उन्हाच्या झळा वाढत आहेत. यातच हळद काढणीला आली आहे. शिवाय 20 एप्रिलपर्यंत (Turmeric Harvesting) हळद काढणीसाठी बळीराजा प्रयत्नांची पराकष्टा सुरु आहे. कारण पुन्हा अणखी (Untimely Rain) अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वाढत्या उन्हाच्या झळामध्ये पीक काढणीची कामे शेत शिवारात सुरु आहेत. केवळ हळदच नाहीतर मराठवाड्यात ज्वारी, गहू या पिकांची काढणी कामे सुरु आहेत.
हळदीला विक्रमी दर
मराठवाड्यात हळदीचे उत्पादन हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अधिक प्रमाणात घेतले जाते. शिवाय वसमत येथील बाजारपेठ हळदीसाठी प्रसिध्द आहे. केवळ राज्यातीलच नाही तर हैदराबाद, कर्नाटकातील व्यापारी येथे हळद खरेदीसाठी येतात. येथील हळदीतून सौदार्य – प्रसाधने तयार केली जातात यामुळे अधिकची मागणी असते. सध्या हळदीला 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर आहे. वाढत्या दराचा फायदा मिळावा म्हणून शेतकरी रात्रीचा दिवस करुन हळद काढणीवर भर देत आहे. वसमत बरोबर सांगली बाजारपेठेतही हळदीला 10 हजार रुपये क्विंटल असाच दर आहे.
अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम हा प्रत्येक पिकावर झालेला आहे. हळद लागवड केलेल्या शेतजमिनीतून पाण्याचा निचराच झाला नाही. परिणामी हळदीचे कंद हे जमिनीतच सडले होते. केवळ नांदेडच नाही तर हिंगोली जिल्ह्यातही अशीच अवस्था झाली होती. अधिकचा काळ पाणी साचून राहिल्याने वाढीवर अन् पर्यायाने उत्पादनावरही परिणाम झाला आहे. घटत्या उत्पादनामुळेच दर वाढले असून भविष्यात यामध्ये अणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
काय आहे हवामान तज्ञांचा सल्ला?
मराठवाड्यात सध्या उष्णतेमध्ये वाढ झाली असली तरी 21 एप्रिलपासून अवकाळीची अवकृपा होणार असल्याचे अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे पण हळद उत्पादकांनी हळदीची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. काढणी करुन हळद पीक भिजले तर न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये काढणी आणि योग्य ठिकाणा साठवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
Vegetable Rate: भाजीपाल्याची उत्पादनावर वाढत्या उन्हाचा परिणाम, आवक घटल्यानंतर काय आहे दराचे चित्र?
Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ