Farmer Success Story : शेतात मासे पाळतो, लाखो रुपयांची कमाई, संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर…
Farmer Story : पारंपारिक शेती करायची नाही असं ठरलं, त्यासाठी कर्ज काढलं आणि डोकं लावलं. आज संपूर्ण गाव त्यांच्या सल्लाने मासे पाळतात. त्याचबरोबर चांगले पैसे देखील कमावत आहेत.
मुंबई : देशात ग्रामीण अनेक शेतकरी मासे पालन (rears fish in the field) करण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळत आहे. सध्या ज्या पध्दतीने ते मासे पालन करीत आहेत, ते पाहून गावातल्या अनेकांनी तशा पद्धतीने मासे पालन (Kisan Success Story) करण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश राज्यातील नरसिंहपूर जिल्ह्यातील चिंटू सिंह सिलावट हे सुरुवातीला पारंपारिक पध्दतीने शेती करीत होते. ती परवड नसल्यामुळे त्यांनी मासे पालन करण्यास सुरुवात केली. सध्या ते त्यातून लाखो (Farmer Story) रुपये कमावतात.
10 टक्क्यांनी कमाई वाढली
चिंटू सिंह सिलावट हे मागच्या तीन वर्षापुर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करीत होते. नंतर त्यांनी बायोफ्लाक टेक्निक वापरुने शेतात खड्डे काढून शेती पालन करण्याचा विचार करु लागले. त्यांनी त्यांच्या शेतात कमी जागेत गोल खड्डा तयार करुन मासे पालन केले. त्यामुळे त्यांची 10 टक्क्यांनी कमाई वाढली आहे. सध्यातरी गावातील अनेक शेतकरी चिंटू सिंह यांच्याकडून प्रेरणा घेऊन मासे पालन करुन अधिक पैसे कमावतात.
बिना तालाब मछली पालन से कमा रहे लाखों रुपये
बायोफ्लॉक मछली पालन से श्री चिंटू सिंह सिलावट की आमदनी 10 गुना बढ़ी
कलेक्टर सुश्री @rijubafna ने यहाँ पहुँचकर बायोफ्लॉक तकनीक से मछली पालन का कार्य देखा।
RM: https://t.co/y11cf0gDnB pic.twitter.com/3lp40pvM85
— Collector Narsinghpur (@dmnarsinghpur) June 14, 2023
सरकारकडून यासाठी ७ लाखाचं कर्ज
चिंटू सिंह सिलावट यांनी 2020 मध्ये शेतात एकवर्षे मेहनत घेतली. त्यावेळी त्यांना त्यातून ३० ते ३५ हजार रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. मासे पालन करण्यात विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यावेळी त्यांनी मत्स्य पालन विभागाकडून बायोफ्लॉक टेक्निकची माहिती घेतली. यासोबतच या तंत्रात बनवलेल्या टाकीसाठी शासनाकडून सात लाखांचे कर्जही मिळाले. त्यामध्ये त्यांना चार लाख रुपयांची सबसिडी मिळाली. सध्या ते फंगेसियस आणि तिलापिया प्रजातीची मासे पालन करीत आहेत.
एका वर्षात अडीच लाखाचं उत्पन्न
चिंटू सिंह सिलावट या शेतकऱ्याला बायोफ्लॉक टेक्निकनुसार मासे पालन केल्यानंतर वर्षाला जवळपास 2.50 लाख रुपये मिळतात. त्यांनी बँकेचं सगळं कर्ज सुध्दा फेडलं आहे. याच्याशिवाय चिंटू सिंह पोल्ट्री फार्ममधून महिन्याला 30 ते 40 कमावतो.