Beed : असा निसर्गाचा लहरीपणा, दोन तासांमध्ये तीन तालुक्यातील पिके उध्वस्त, नेमके काय झाले बीड जिल्ह्यात..!
वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या तीन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे.

बीड : शेती व्यवसाय हा (Monsoon Rain) मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पण हाच पाऊस यंदा नुकासनीलाही कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसला असला तरी (Beed District) बीडमध्ये सरासरी एवढा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. शिवाय वातावरणही पोषक होते. राज्यात पावसाने उसंत घेतली असताना मात्र, रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्यात अशी काय पावसाने हजेरी लावली आहे की सर्व (Crop Damage) पिके पाण्यात आहेत. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत असताना दोन तास झालेल्या या पावसाने तीनही तालुक्यातील पिके उध्वस्त केली आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत.
तीन तासांमध्ये 226 मिमी पावसाची नोंद
वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीडमध्ये तशी पावसाची अवकृपाच राहिली आहे. मात्र, सातत्य असल्याने पिके तरली होती. मात्र, रविवारी अवघ्या दोन तासांमध्येच 226 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वडवणी, माजलगाव आणि गेवराई शिवारात पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांची कामे तर खोळंबली आहेतच पण आता पाणी साचून राहिल्यावर त्याचा परिणाम पीक वाढीवर होणार आहे. आतापर्यंत खरिपातील पिकांवर कोणताच धोका नव्हता पण तीन तासामध्य सर्व चित्र बदलून गेले आहे. कापूस, सोयाबीन ही मुख्य देखील पाण्यात आहेत.
पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप
अवघे तीन तास झालेल्या पावसामुळे चौहिकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होणार आहे. शिवाय शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. आतापर्यंत सर्वकाही पोषक होते मात्र, एका दिवसामध्ये खरिपाचे चित्र बदलून गेले आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्रावर पेरा झाला होता. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत असतानाच हे संकट समोर आले आहे. जागोजागी पाणा साचलेले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.




गोगलगायीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त
गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील पिकांचे नुकसान केवळ गोगलगायीमुळे झाले आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली असून शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी चर खोदण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. आतापर्यंत उत्पादनाचे स्वप्न पाहणारा शेतकरी आता पिके जोपासण्यासाठी धडपड करीत आहे.