चक्री वादळामुळे लिंबूची बाग जमीनदोस्त, मोठी झाडे उन्मळून पडली
बुलढाणा जिल्ह्यात सतत दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात उन्हाचा तडाखा जानवत होता. काल सायंकाळी मेहकर परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
पुणे : पुण्याच्या पुरंदर (pune purandar) तालुक्यातील यादववाडी आणि सटलवाडी परिसरात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस (unseasonal rain) झाला आहे. बुधवारी सायंकाळी अचानक वादळ वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. पावसाबरोबरच जोराचा वारा असल्याने येथील पिकाचं नुकसान झालंय. झाडावरील आंबे (mango crop demage) वाऱ्यामुळे खाली पडून आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकाचं सुद्धा यामध्ये नुकसान झालंय. तर अनेक ठिकाणी वीज वितरणाचे खांबही पडले आहेत, त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत वीज गेली होती. काही ठिकाणी झाडेही पडली आहेत, 40 ते 50 मिनिटे हा पाऊस पडत होता. त्यामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले होते. विशेष म्हणजे या दोन गावातच पाऊस झाला आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी मात्र अजिबात पाऊस पडला नाही.
शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामे थांबली.
बुलढाणा जिल्ह्यात सतत दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात उन्हाचा तडाखा जानवत होता. काल सायंकाळी मेहकर परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. बदलत्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात बऱ्याच भागात दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मशागतीचे कामे खोळंबली आहेत.
घुसर येथील शेतकऱ्याचे मोठं नुकसान ..
बुलढाणा जिल्ह्यात परवा झालेल्या अवकाळी पाऊस, आणि वादळी वाऱ्याने घुसर येथील शेतकरी प्रवीण कुसुंबे यांच्या शेतातली लिंबूची बाग उद्धवस्त झाली आहे. निंबूची असंख्य झाडे ही वादळी वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी प्रवीण घुसर् यांनी त्यांच्या दोन एकर शेतात दहा वर्षांपूर्वी लिंबुची बाग लावलेली आहे. झाडे ही मोठी आहेत, मात्र परवा आललेया वादळी वाऱ्यामळे त्यांच्या शेतातली असंख्य झाडे ही उन्मळून पडली, प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात काल सांयकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. लालवाडी गावावर वादळी वाऱ्यासह तब्बल दोन तास हा पाऊस बरसलाय. या मान्सून पूर्व पावसाने उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान झालेय, तर उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पावसाच्या या हजेरीने मशागतीच्या कामांचा मात्र खोळंबा झालाय.