हमीभाव केंद्र 10 दिवसापुरतेच, आधारभूत किंमतीपेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा भाव, कसे बदलले तूरीचे दर?
शेतकऱ्यांची वाढती मागणी प्रशासानाची नियमावली यामुळे निर्धारीत वेळेत राज्यात तूर हमीभाव केंद्र सुरु झाली पण ती 10 दिवसापुरतेच का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण आता हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारपेठेत तूरीचे दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता व्यापाऱ्यांकडेच आहे तर खरेदी केंद्र ही ओस पडत आहेत.
लातूर : शेतकऱ्यांची वाढती मागणी प्रशासानाची नियमावली यामुळे निर्धारीत वेळेत (Maharashtra) राज्यात तूर हमीभाव केंद्र सुरु झाली पण ती 10 दिवसापुरतेच का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण आता ( Guarantee Centre) हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारपेठेत तूरीचे दर हे वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता व्यापाऱ्यांकडेच आहे तर खरेदी केंद्र ही ओस पडत आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Tur Crop) तुरीला सध्या 6 हजार 500 असा सर्वसाधारण दर मिळत आहे. तर खरेदी केंद्रावर 6 हजार 300 दर ठरवून देण्यात आलेला आहे. नवीन तुरीची आवक सुरु झाली असली तरी जुन्याच तुरीला अधिकची मागणी आहे.
10 दिवसापासूनच सुरु झाले आहेत हमीभाव केंद्र
राज्यात 186 तूर हमीभाव केंद्र ही नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांची लूट होऊ नये तूरीला आधारभूत किंमत मिळावी म्हणून ही केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पण हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या दरात तब्बल 800 रुपायांनी वाढ झाली आहे. परिणामी हमीभाव केंद्रावरील दरापेक्षा बाजारात तुरीला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता, पैशासाठी लागणारा अधिकचा कालावधी या भानगडीत न पडता शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडेच तुरीची विक्री करीत आहे.
जुन्या तुरीला अधिकचा दरही
खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीचीही आता आवक सुरु झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ तुरीचा पेरा अधिकच्या क्षेत्रावर झाला होता. मात्र, वातावरणातील बदल आणि अंतिम टप्प्यात मरा रोगाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झाली आहे. सध्या अडीच हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. तुरीला सर्वसाधारण 6 हजार 500 चा दर मिळत आहे. नवीन तुरीपेक्षा जुन्याच तुरीला अधिकची मागणी असून 100 ते 200 रुपायांची तफावत आहे. जुन्या तुरीवर पावसाचा आणि रोगराईचा परिणाम झालेला नाही. शिवाय ही तूर वाळलेली आणि चांगल्या दर्जाची असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची
खरीप हंगामातील पिकांवर निसर्गाचा लहरीपणा राहिलेला असला तरी शेतीमाल बाजारात दाखल करताना शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच दर अवलंबून राहिलेले आहेत. यापूर्वी सोयाबीन आणि कापसाच्या दरातही असेच झाले होते. कमी दर असताना शेतीमालाची केलेली साठवणूक शेतकऱ्यांच्या फायद्याची राहिलेली आहे. त्यामुळे आता तुरीबाबतही शेतकऱ्यांनी जर सावध भूमिका घेतली तर हा फरक पाहवयास मिळणार आहे. हंगामाच्या सुरवातीला 2 हजार 500 क्विंटल तूरीची आवक होत आहे. हीच आवक नियमित राहिली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
संबंधित बातम्या :
Solapur : 1 हजार 54 ट्रक अन् 1 लाख 5 हजार क्विंटल कांदा बाजारपेठेत, कशामुळे झाली विक्रमी आवक?
Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब
Rabi Season : ढगाळ वातावरणामुळे खर्चही वाढला अन् शेतकऱ्यांची चिंताही, काय आहे उपापयोजना?