Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार घेणार गांजा शेतीबाबत मोठा निर्णय! शेतकऱ्यांना कसा होणार फायदा जाणून घ्या

गांजाची शेती करणं देशात बेकायदेशीर मानलं जातं. पण अनेकदा लपवाछपवी करत गांजाची शेती केली जाते. यावर लगाम लावण्यासाठी आणि हजारो कोटींचा महसूल जमा करण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे.

राज्य सरकार घेणार गांजा शेतीबाबत मोठा निर्णय! शेतकऱ्यांना कसा होणार फायदा जाणून घ्या
गांजा शेतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 6:38 PM

मुंबई : गांजा शेतीला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी आता प्रयत्न होत आहेत. कारण अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. यासाठी आता राज्य सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने पहिल्यांदाच गांजाची नियंत्रित शेती करण्यावर विचार सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.

निसर्गाच्या लहरीपणामुळे हिमाचलमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्याचबरोबर सरकारवर 75 हजार कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे मधला मार्ग काढण्यासाठी गांजाच्या शेतीचा विचार होत आहे.

एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे आयात होणारे स्वस्त सफरचंद यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी आणि औषधी हेतूंसाठी गांजाची नियंत्रित शेती करण्यावर सरकारचा जोर आहे.

दुसरीकडे, बेकायदेशीर विक्रेत्यांना यामुळे चाप बसेल आणि सराकारच्या तिजोरीत चांगला पैसा जमा होईल, असा यामागचा उद्देश आहे. गांजाच्या नियंत्रित शेतीमुळे सरकारला वर्षाला 800 ते 1000 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी नियंत्रित ठिकाणी शेतीला परवानगी दिली आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यास मदत होणार आहे.

सरकारने यासाठी एका समितीचं गठन केलं आहे. या समितीमार्फत फायदे आणि तोट्याचा तपास केला जाईल. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी सांगितली, “आमचा कायदा फक्त गांजाची पाने आणि बियांच्या वापराबाबत बनवला जाईल. केंद्र सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये गांजाची लागवड कायदेशीर केली आहे.”

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.