Special News | सोयाबीन अन् सोयापेंड, नेमकं नातं काय ?
गेल्या 15 दिवसांपासून कृषी क्षेत्रात सोयापेंडची आयात आणि बाजारात सोयाबीनचे दर या दोन गोष्टींचीच चर्चा आहे. या दोन्ही उत्पादनाचे दर हे एकमेकांवर अवलंबून आहेत. यंदाच्या खरीप हंगमातील सोयाबीन अजूनही वावरातच उभे असताना चर्चा सुरु झाली होती ती सोयापेंडच्या आयातीची. आणि सोयाबीन बाजारात दाखल होण्यापूर्वीच 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
लातूर : शेतीमालाचा दर हा शेतकऱ्यांनाही ठरवता येत नाही. पण सोयाबीनपासूनच उत्पादित झालेल्या सोयापेंडच्या उत्पादनावरच (Soybean rate) सोयाबीनचे दर अवलंबून आहेत. हे जरा समजून घ्यायला सोयाबीन आणि सोयापेंड यांच नात नेमकं काय? हे आगोदर समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या 15 दिवसांपासून कृषी क्षेत्रात (impact of soypend) सोयापेंडची आयात आणि बाजारात सोयाबीनचे दर या दोन गोष्टींचीच चर्चा आहे. या दोन्ही उत्पादनाचे दर हे एकमेकांवर अवलंबून आहेत. यंदाच्या खरीप हंगमातील (soybean production,) सोयाबीन अजूनही वावरातच उभे असताना चर्चा सुरु झाली होती ती सोयापेंडच्या आयातीची. आणि सोयाबीन बाजारात दाखल होण्यापूर्वीच 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
त्यामुळे अतिवृष्टीने उत्पादनात निम्म्याने घट होऊनही हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे सोयाबीन आणि सोयापेंड यांच नेमका संबंध काय आणि सोयाबीनच्या दरावर याचा काय परिणाम होतो हे आजही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सोयापेंडच्या आयातीला मिळालेल्या स्थगितीचा काय परिणाम हे आपण पाहणार आहोत.
सोयापेंड
सोयाबीन पासूनच सोया सीड म्हणजेच सोयापेंड हे तयार होते. पुढे हेच सोयापेंड सोयाबीन दराच्या वाढीसाठी अडसर ठरते. ते कसे? तर सोया सीड म्हणजेच धान्य या बियांच्या माध्यमातूनच 20 टक्के तेल तयार केले जाते तर उर्वरीत 80 टक्के हा चोथा राहिला जातो. हा चोथा म्हणजेच पेंड. या पेंडीमध्ये पोषणमुल्ये, प्रथिने असल्याने त्याचा वापर जनावरांना खाद्य म्हणून केला जातो. विशेषत: पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्याचे हे मुख्य खाद्य आहे. मात्र, हेच सोयापेंड यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दराला अडसर ठरलेले आहे. सोयाबीन बाजारात दाखल होताच केंद्र सरकारने तब्बल 12 लाख टन सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आपोआपच घट झाली. कारण सोयापेंड आणि सोयाबीनच्या दरात मोठी तफावत असल्याने तेलप्रक्रिया उद्योजक हे सोयापेंडचीच खरेदी करतात. शिवाय तेल खरेदीमधून खराब झालेला चोथाच म्हणजेच सोयापेंडचा वापर हा जनावरांच्या खाद्य म्हणून केला जात होता.
आयात सोयापेंड संपुष्टात येताच सोयाबीनच्या दरात सुधारणा
ऑगस्ट महिन्यात 12 लाख टनापैकी 6 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात केंद्र सरकारने केली होती. तब्बल अडीच महिने ह्या आयात केलेल्या सोयापेंडवरच तेल प्रक्रिया उद्योजक यांनी भर दिला एवढेच नाही मागणीनुसार सोयापेंडचा पुरवठा होत असल्याने मुहूर्ताच्या सोयाबीनला दर 11 हजाराचा मिळाला त्यानंतर मात्र, महिन्याभरातच हे दर 4 हजार 500 वर येऊन ठेपले होते. घटत्या दरामुळे शेतकऱ्यांनी कमी किंमतीमध्ये सोयाबीनची विक्री न करता साठवणूकीवर भर दिला होता. दिवाळीपर्यंत सोयाबीनची आवकच कमी होती. दरवर्षी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर सोयाबीनची आवक ही 50 हजार पोत्यांची असते तर यंदा मात्र, संपूर्ण हंगामातही 25 हजार पोत्यांच्या पुढे आवक गेलेली नाही.
शेतकऱ्यांचा निर्णय अन् योग्य मोबदलाही
शेतातला माल थेट बाजारपेठेत ही शेतकऱ्यांची मानसिकता आहे. यंदा मात्र, अतिवृष्टीचा परिणाम सोयाबीनवर तर झालेलाच होता. पण अपेक्षित दर 10 हजाराचा असताना सोयाबीनला 4 हजार 500 चा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच नाही असा निर्धार केला होता. एका गावाने तर 10 हजार रुपये क्विंटलप्रमाणेच सोयाबीन विक्रीचा ग्रामपंचायत स्तरावरच ठराव घेतला होता. मागणी असतानाही तब्बल दोन महिने सोयाबीनच्या साठवणूकीवरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. अखेर दिवाळीनंतर सोयाबानच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली होती. यंदा शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळाले होते. त्यामुळे एकदम सोयाबीनची विक्री न करता टप्प्याटप्प्याने विक्री केली जात होती. त्यामुळेच 4 हजार 500 वर गेलेले सोयाबीन एका महिन्यात 6 हजार 500 येऊन ठेपले होते. तर दुसरीकडे आयात केलेल्या सोयापेंडचाही साठा कमी झाला होता. त्यामुळे प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला मागणी होताच दरातही वाढ झाली.
पुन्हा सोयापेंड आयातीच्या हलचाली
दिवाळीनंतर एकीकडे सोयाबीनचे दर वाढत होते दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात आयात केलेले सोयापेंड हे अंतिम टप्प्यात होते. सोयाबीनचे वाढते दर अन् सोयापेंडची घट यामुळे तेलप्रक्रिया उद्योजक अडचणीत आले होते. शिवाय जनावरांना आणि पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांना खाद्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सोयाबीन खरेदीशिवाय पर्यायच न राहिल्याने सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली परिणाम दरही वाढले. मात्र, आता वाढीव दराला पोल्ट्रीधारकांचा विरोध असून पुन्हा उर्वरीत सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री यांच्याकडे केली होती. त्यामुळे यांच्या मागणीनुसार जर सोयापेंडची आयात झाली तर पुन्हा सोयाबीनचे दर हे गडगडले असते.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा, धाकधूक मात्र कायमच
सोयापेंडच्या आयातीला शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांमधून विरोध सुरु झाला होता. आता कुठे दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत असतानाच कोंबड्यांना योग्य दरात खाद्य मिळावे या उद्देशाने सोयापेंड आयातीची मागणी केली जात होती. मात्र, महाराष्ट्रातील नेत्यांचा आणि शेतकऱ्यांचा याला विरोध असल्याने अखेर असा कोणताही प्रस्ताव ग्राह्य धऱला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज बांधलेला आहे. मात्र, सोयापेंडची आयात अन् सोयाबीनचे दरावर होणारा परिणाम यांचा असा संबध असून सोयबीनपासून उत्पादीत सोयापेंडच्या दरावरच पुन्हा सोयाबीनचे भाव हे ठरणार हे मात्र नक्की..