Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drone Farming : स्वप्न सत्यात..! शेती व्यवसायामध्ये अमूलाग्र बदल, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा? वाचा सविस्तर

सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणीचे प्रयोग राबवले जात आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना काय अडचण येणार तर नाही, याची माहिती घेण्यासाठी हे प्रयोग केले जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जेवणाळा शिवारात हा प्रयोग राबण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनाही योग्य ती माहिती देण्यात आली.

Drone Farming : स्वप्न सत्यात..! शेती व्यवसायामध्ये अमूलाग्र बदल, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा? वाचा सविस्तर
भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यात ड्रोनद्वारे पीक फवारणीचा प्रयोग करण्यात आलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 6:03 PM

भंडारा : शेतकऱ्यांनी (Crop Change) पीकपद्धतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न केला मात्र, अपेक्षित उत्पन्न पदरी पडलेच नाही. आता (Central Government) केंद्र सरकारच्या पुढाकारातून थेट शेती पद्धतीमध्येच बदल केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले (Drone Farming) ड्रोनचा वापर आता प्रत्यक्षात होऊ लागला आहे. प्रायोगिक तत्वावर हे प्रयोग केले जात आहेत.  असाच प्रयोग भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांब येथील मनीषा नागलवाडे या महिला शेतकऱ्याच्या शेतामध्ये झाला.  प्रायोगिक तत्तावर ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणीचा प्रयोग केला आहे. शिवाय यशस्वीरित्या फवारणीही झाली आहे. त्यामुळे भविष्यात शेतशिवारात ट्रॅक्टर, बैलजोडी ऐवजी हवेत ड्रोन फिरले तर नवल वाटायला नको.

काय आहेत फायदे?

शेती व्यवसायात अमूलाग्र बदल घडवूण आणण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीवरच केंद्राने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय ड्रोनसाठी अनुदानही देऊ केले आहे. ड्रोनमुळे वेळीच बचत आणि मजुरांची आवश्यकता लागत नाही. सध्या कामाला मजुर मिळणे शक्यच नाही. शिवाय पीक फवारणीसाठी यंत्राचा वापर होत असल्याने समप्रमाणात फवारणी कामे होतात. शिवाय वेळेची बचत आणि शारिरीक कष्टही कमी. यामुळे ही अत्याधुनिक पद्धती शेतकऱ्यांना परवडणारी आहे.

जेवणाळ्याच्या शिवरात उडले ड्रोन

सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणीचे प्रयोग राबवले जात आहेत. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना काय अडचण येणार तर नाही, याची माहिती घेण्यासाठी हे प्रयोग केले जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जेवणाळा शिवारात हा प्रयोग राबण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनाही योग्य ती माहिती देण्यात आली. किटकनाशकाचे प्रमाण आणि वापरायची पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन असले तरी सरावनुसार शेतकरी हे आत्मसात करतील असा विश्वास आहे.

दहा एकरावरील फवारणी

ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य आहे. एकाच ठिकाणी उभे राहून ड्रोनद्वारे पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने करता येते. 30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येत आहे. तांत्रिक माहिती ही शेतकऱ्यांना अशा सरावातूनच होणार आहे.

धान पिकावर प्रयोग

भंडारा जिल्ह्यात यंदाही धान पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे. पावसाने आता उघडीप दिल्याने उत्पादनाबाबत आशा उंचावल्या आहेत. मोहाडी तालुक्यात ड्रोन शेतीचा प्रयोग हा धान पिकांवर करण्यात आला. यावेळी उपस्थितांना आवश्यक ती माहिती शेतकऱ्यांना दिली.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.