Kharif Season : शेतकऱ्यांचा सोयाबीनवर भर, पाण्यातले सोयाबीन बहरणार कसे? कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला..!

गेल्या 10 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. खरिपातील पिके ही पावसाळ्यातली असली तरी उगवण होताच पिके पाण्यात गेल्याने नुकसान अटळ आहे. बुधवारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे.

Kharif Season : शेतकऱ्यांचा सोयाबीनवर भर, पाण्यातले सोयाबीन बहरणार कसे? कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला..!
खरिपातील सोयाबीन पिकात पावसाचे पाणी साठले आहे. त्याचा निचरा झाला तरच पिकांची वाढ होणार आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:56 AM

उस्मानाबाद : (Soybean Crop) सोयाबीनचा पेरा उशिराने झाला तरी उत्पादनात घट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्यांना डावलून सोयाबीनवर भर दिला. पेरणी उशिरा झाली तर उगवण क्षमता जोमात होती. मात्र, पिकांची उगवण होताच मराठवाड्यासह राज्यात (Heavy Rain) पावसाने अशा धडाका सुरु केला आहे ज्यामुळे पिके तर पाण्यात आहेतच पण अनेक ठिकाणी शेत जमिनीही खरडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य पिकावरच अवलंबून आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांची वाढ होणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने पावसाने उघडी दिली की काय करायचे याबाबत महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यामुळे पिकांची वाढ तर होईलच पण योग्य त्या किटकनाशकांची फवारणी करणेही गरजेचे आहे.

काय आहे कृषी विभागाच सल्ला?

गेल्या 10 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. खरिपातील पिके ही पावसाळ्यातली असली तरी उगवण होताच पिके पाण्यात गेल्याने नुकसान अटळ आहे. बुधवारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले आहे.

कडधान्य सोडाच, इतर पिकांवर भर द्या

यंदा आगोदरच खरीप पेरणी उशिर झाला आहे. यामध्येच गेल्या 10 दिवसांपासून संततधार ही सुरु आहे. त्यामुळे काही क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे आता वाफसा झाला तरी शेतकऱ्यांनी मूग, उडदाचा पेरा न करता इतर पिकांना प्राधान्य देणे हेच फायद्याचे ठरणार आहे. कारण कडधान्याचा पेरा उशिरा झाल्यास उत्पादनात मोठी घट होते. सध्या जवळपास 1 महिना उशिराने पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, कांदा या पिकांवर भर देण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपात सोयाबीनवरच भर

मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. यातच यंदा पेरण्या उशिराने झाल्याने सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. वर्षभर सोयाबीनचे दर हे सरासरी एवढे राहिले आहेत तर कापसाला विक्रमी असा 14 हजार रुपये क्विंटल दर मिळाला असताना देखील शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.