खरा हापूस आंबा नेमका कसा ओळखालं? जाणून घ्या टीप्स

बाजारातील विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा 'हापूस आंबा' किंवा 'अल्फोन्सो आंबा' या नावाने विकतात. (How to Identify Real Alphonso Hapus Mango)

खरा हापूस आंबा नेमका कसा ओळखालं? जाणून घ्या टीप्स
Mango
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:38 PM

मुंबई : उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. ‘हापूस आंबा’ असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा ‘हापूस आंबा’ किंवा ‘अल्फोन्सो आंबा’ या नावाने विकतात. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण असते. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)

हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची इतर कुठेही लागवड केली, तर त्याला विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात. बहुतांश घरात अक्षय तृतीयापासून आंबा खायला सुरुवात करतात.

?हापूस आंबा नेमका कसा ओळखालं??

?चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.

?इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.

?नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे, पण कठोर असतात.

?नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)

mango

आंबा

?पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.

?हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.

?एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे. मात्र जर आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असेही काहीजण ओळखतात.

?शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)

संबंधित बातम्या :

लिंबापासून संत्री, मोसंबीपर्यंत वर्षभर असते मागणी, या फळांच्या लागवडीतून अधिक कमाईची संधी

लॉकडाऊनची भीती, शेतकऱ्यानं आंबा विक्रीसाठी लढवली शक्कल, 2 दिवसात मिळालं यश

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.