Kharif Season : सोयाबीनचे घरचे बियाणे फायद्याचे पण तयार कसे करायचे? कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला

घरचे बियाणे तयार करण्याची एक प्रक्रिया असली तरी केलेला प्रयोग यशस्वी आहे का तो तपासणेही गरजेचे आहे. म्हणूनच गोणपाटाचा आधार घेऊन हे बियाणे साठवले जाते. गोणपटामध्ये गुंडाळलेल्या 100 बियाणांपैकी 70 बियाणांची उगवण झाली तरी बियाणे पेरणी योग्य आहे असे समजावे. घरच्या बियाणांबाबत परिश्रम असले तरी उत्पादनात वाढ निश्चित मानले जाते.

Kharif Season : सोयाबीनचे घरचे बियाणे फायद्याचे पण तयार कसे करायचे? कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला
बियाणे
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:35 PM

लातूर : मराठवाड्यात केवळ (Kharif Season) खरीप हंगामातीलच नव्हे तर उन्हाळी हंगामातही सोयाबीन हेच हुकमी पीक ठरत आहे. दिवसेंदिवस सोयाबीन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. क्षेत्र वाढत असले (Soybean Seed) बियाणांबाबतच्या तक्रारी देखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणावर भर देण्याचे आवाहन (Agricultural Department) कृषी विभागाने केले आहे. मात्र, घरचे बियाणे वापरताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात अनेकांना काही माहितीच नसते. त्यामुळे ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी असून पेरणीपूर्वी काळजी घेतली तर नुकसानही टळणार आहे आणि अतिरिक्त खर्चही टळणार आहे. उत्पादनसाठी घऱचे बियाणे उपयुक्त असते पण त्याचे व्यवस्थापन अवगत असणे गरजेचे आहे.

असे करा घरचे बियाणे तयार!

काळाच्या ओघात बियाणांचे वाढते दर अन् बेभरवश्याचे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना घरचे बियाणेच फायदेशीर ठरते. यासाठी उगवण क्षमता काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बंद पोत्यातील मूठभर धान्य बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्व पोत्यांमधील काढलेले धान्य हे एकत्र करुन घ्यावे लागणार आहे. त्यानंतर काढलेले सोयाबीन हे स्वच्छ धुऊन घ्यावे लागते. गोणपाटाचा एक तुकडा हा जमिनीवर पसरणे गरजेचे आहे. पोत्यातून बाजूला काढलेल्या धान्यातून 100 दाणे मोजावे आणि दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर ओळीत ठेऊन त्याचे तीन नमुने तयार करावे लागणार आहे. त्यानंतर गोणपटावर चांगले पाणी मारल्यामुळे ते ओले करावे लागणार आहे.गोणपटावर पाणी शिंपडून ते ओले तर करावेच लागते. यानंतर बियाणांवर दुसऱ्या गोणपटाचा वापर करवा लागणार आहे. गोणपटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गुंडाळी करुन ते गोणपाट थंड हवेच्या ठिकाणी आणले जाते. सलग सात दिवसानंतर गोणपाटाची गुंडाळी करुन ठेवावे लागणार आहे.

अशी ओळखा बियाणांची गुणवत्ता

घरचे बियाणे तयार करण्याची एक प्रक्रिया असली तरी केलेला प्रयोग यशस्वी आहे का तो तपासणेही गरजेचे आहे. म्हणूनच गोणपाटाचा आधार घेऊन हे बियाणे साठवले जाते. गोणपटामध्ये गुंडाळलेल्या 100 बियाणांपैकी 70 बियाणांची उगवण झाली तरी बियाणे पेरणी योग्य आहे असे समजावे. घरच्या बियाणांबाबत परिश्रम असले तरी उत्पादनात वाढ निश्चित मानले जाते.

हे सुद्धा वाचा

बियाणे-खतामध्ये अडचणी असा करा संपर्क

बियाणे आणि खत विक्रीमध्ये अनियमतिता आढळून अल्यास कृषी विभागाने जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे अनियमिततेला आळा बसणार असून शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी सरकारने काही नंबरही दिले आहेत. शेतकऱ्यांना तक्रार असल्यास8446117500 या मोबाईवर संपर्क साधणे गरजेचे आहे. शिवाय 18002334000 हा टोल फ्री क्रमांवरही संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.