KCC | किसान क्रेडिट कार्ड प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत मोठा निर्णय

पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. Kisan Credit Card

KCC | किसान क्रेडिट कार्ड प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत मोठा निर्णय
किसान क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 3:30 PM

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारनं देशातील कृषी क्षेत्रामद्ये अर्थपुरवठा वाढावा म्हणून विशेष प्रयत्न गेल्या काही काळात केलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हा त्याचा एक भाग मानला जातो. मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ठरवलेलं आहे. शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यात आलीय. किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकांची फी रद्द करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायी जमा करण्याची प्रक्रिया देखील रद्द करण्यात आलेली आहे. (How to make Kisan Credit Card know details and necessary documents kyc verification is cancelled now)

किसान क्रेडिट कार्ड कसं बनवणार?

केंद्र सरकारन किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्डला अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावा. तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा. केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा. पीएम किसान योजनेचा लाभ ज्या बँकेत मिळतो त्या खात्याची माहिती किसान क्रेडिट कार्डचा अर्ज भरताना सादर करावी लागेल. या प्रक्रियेत नव्यानं केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही.

शेतकरी क्रेडिट कार्ड कोण बनवू शकतं?

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो.

कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

KCC साठी महत्त्वाचे कागदपत्र

वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. (Kisan Credit Card) याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

143 लाख टन साखर गोदामात पडून, पोत्यामागं दररोज 1 रुपया व्याज; साखर कारखानदारी संकटात

हरियाणात 10,000 शेतकऱ्यांचं शक्तिप्रदर्शन, अखेर भाजप सरकारनं 350 शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले

(How to make Kisan Credit Card know details and necessary documents kyc verification is cancelled now)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.