बीड : कधी पावसाअभावी तर कधी किडीच्या प्रादुर्भावामुळे खरिपातील (Karif) पिके ही धोक्यात राहिलेली आहेत. सर्वात फटका बसला तो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे. असे असतानाही आहे त्या पिकातून अधिकचे उत्पन्न घ्यायचे कसे याचे मार्गदर्शन आता शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. (Rain) मध्यंतरीच रब्बी हंगामाच्या अनुशंगाने राज्यात शेतीशाळा ह्या घेतल्या जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे खरिप हंगामातील शेतीशाळा ह्या पार पडत आहेत. यातून शेतकऱ्यांना आहे त्या पिकातून अधिकचे ऊत्पन्न कसे मिळवायचे याचे धडे दिले जात आहेत.
यंदाच्या खरिप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवेळीच्या पावसामुळे खरिपातील मुख्य पिकाला मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही आहे त्या पिकातून जास्त ऊत्पन्न कसे घ्यावयाचे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जात आहे. अगदी योग्य वेळी शेतकऱ्यांना याबद्दल मार्गदर्शन होत असल्याने याचा फायदा होणार आहे. पावसाने उघडीप दिली तर बीड जिल्ह्यात सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करताना योग्य झाडांची करणे, इतर जातीचे वाण हे वेगळे ठेवणे शिवाय सोयाबीनचे दोन ढीगारे लावून शेंगाच्या प्रतिनुसार वर्गवारी करणे आवश्यक आहे. शेंगामधील हिरवी व सुरकत्या पडलेली बियाणे ही चांगल्या सोयाबीनाध्ये मिसळल्यात शेतकऱ्यांना कमी भाव मिळेल. अशा बारीक बाबींचा विचार करुन सोयाबीनची काढणी आवश्यक आहे.
सोयाबीन काढताना त्याची कांद्याप्रमाणे वर्गवारप करावी, चांगल्या सोयाबीनमध्ये जर हिरव्या शेंगा व सुरकुत्या पडलेले बियाणे मितळले तर चांगल्या सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्या ती काळजी घेणे आवश्यक आहे. साठवूण ठेवलेल्या सोयाबीनला कर फूटु नये म्हणून शेतामधून चर काढून देणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा करुन साठवलेल्या ठिकाणी हवा खेळती ठेवण्याचा सल्ला बीडचे आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांना शेतकऱ्यांना दिला आहे.
सध्या काही सोयाबीनची काढणी ही सुरु आहे तर उशीरा पेरा झालेल्या सोयाबीनच्या काढणीला अजूनही 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आता सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन दिले जात असले तरी खर्चाने मेटाकूटीला शेतकरी आता आहे त्या परस्थितीमध्या काढणीला सुरवात करीत आहे. सोयाबीन या पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत कायम धोका राहिलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली तरी वावरात असलेले सोयाबीन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न राहणार आहेत. (If you want a fair rate, do this by dividing the crop, advice from the agriculture department to the farmers)
Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका