FACT CHECK | खरच डीएपीच्या किंमती 300 रुपयांनी वाढवल्या? इफकोनं काय केला दावा?
सरकारी क्षेत्रातील कंपनी इफको कंपनीनं देखील डीएपीच्या किमंती वाढवल्या असल्याचा दावा केला जात होता. iffco denied dap npa and nps fertilizers rate hike news
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील खत उत्पादक कंपन्यांनी डीएपीच्या दरात वाढ केली आहे. खासगी कंपन्यांनी 50 किलोच्या पोत्यामागे 300 रुपये वाढवले आहेत. सरकारी क्षेत्रातील कंपनी इफको कंपनीनं देखील डीएपीच्या किमंती वाढवल्या असल्याचा दावा केला जात होता. मात्र, कंपनीनं हा दावा फेटाळला आहे. (iffco denied dap npa and nps fertilizers rate have been increased for farmers)
इफकोचा दावा काय?
इफकोनं माध्यमांमध्ये डीएपीच्या किंमती वाढवल्याचा ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असल्याचं म्हटलं आहे. आमच्याकडे 11.26 लाख मेट्रिक टन रासायनिक खत आहे. शेतकऱ्यांना डीएपी जुन्या किंमतीला मिळेल, असं इफकोनं म्हटलं आहे. ज्या पोत्यांवर नव्या किंमती छापल्या आहेत ते खत विक्रीसाठी नसल्याचा दावा कंपनीचे सचिव डॉ.यू.एस. अवस्थी यांनी केला आहे. इफकोनं जुन्या दरात विक्री रासायनिक खतांची विक्री केली जाईल, असं म्हटलं आहे.
किंमती वाढवल्याची चर्चा कशी सुरु झाली?
इफकोच्या मार्केटिंग विभागाकडून 7 एप्रिलला एक पत्र जारी करण्यात आलं होतं. संबंधित पत्रामध्ये डीएपीच्या किंमती वाढवण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्या पत्रातील किंमती 1 एप्रिलपासून डीएपी 1900 रुपयांना विकले जाईल, असं म्हटलं होते. संबंधित पत्रावर मार्केटिंग डायरेक्टर योगेंद्र कुमार यांची सही होती.
इफकोच्या अधिकाऱ्यांचं ट्विट
#IFFCO have 11.26 Lakh MT of complex fertilisers & will sell at old rates of #DAP ₹1200/-, #NPK 10:26:26 ₹1175/-, #NPK 12:32:16 ₹1185/- & #NPS 20:20:0:13 ₹925/-. The material with new rates is not for sale to anyone. @PMOIndia @DVSadanandGowda @mansukhmandviya @fertmin_india
— Dr. U S Awasthi (@drusawasthi) April 8, 2021
भारतात इफकोचे पाच प्लांट
इफकोकडे भारतामध्ये 5 उर्वरक संयंत्र आहेत. खतनिर्मिती क्षेत्रात इफको देशातील सर्वात मोठी संस्था आहे. इफकोने सामान्य विमा, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, खाद्यप्रक्रिया और जैविक शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन नफा वाढवला आहे. गेल्या 54 वर्षांमध्ये इफको भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च प्रतीचं खत पुरवठा करण्याचा प्रयत्न केलाय. इफको भारतात उत्पादित होणाऱ्या फॉस्फेटिकमध्ये 32.1 टक्के, यट्रोजन उर्वरक निर्मितीत 21.3 टक्के योगदान देते. फॉर्चून 500 भारत कंपन्यांच्या यादीमध्ये इफको 57 व्या स्थानावर आहे.
यूरियाचा वापर वाढतोय
भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी हरित क्रांतीनंतर (1965-66) यूरीयाचा वापर सुरु करण्यात आला. 1980 मध्ये 60 लाख टन यूरिया वापरला जात होता. 2017 मध्ये यूरियाचा वापर 3 कोटी टनापर्यंत पोहोचला. 2018-19 मध्ये 320.20 लाख टन यूरीयाची विक्री झाली. तर, 2019-20 मध्ये 336.97 लाख टन यूरिया विकला गेला. पीएम नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नीम कोटेड यूरिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. नीम कोटेड यूरियामुळे सामान्य यूरियापेक्षा प्रदूषण कमी होते.
संबंधित बातम्या
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले
शेतकऱ्यांसाठी खुशखबर!, डीएपीच्या किमती जैसे थे, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय
(iffco denied dap npa and nps fertilizers rate have been increased for farmers)