नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिलं, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस होईल, मात्र दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Imd predicted monsoon to be normal in month of july imd rain updates )
देशात शेतकरी खरिप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका अंदाजानुसार 20 कोटी शेतकरी खरिप हंगामात धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भूईमूग, ऊस, उडीद आणि तूर या पिकांची लागवड करत आहेत. खरिप हंगामातील शेती प्रामुख्यानं मान्सूनच्या पावसावर अवंलंबून असते. मान्सून सामान्य राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. खरिपातील पिकांना पाणी द्यावं लागत नाही.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहिल. भारतीय हवामान विभाग ऑगस्ट महिन्याचा अंदाज जुलै महिन्याच्या शेवटी किंवा 1 ऑगस्टला जारी करेल. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस हरियाणा, पंजाब दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात अद्यापही पोहोचलेला नाही. या भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही.
भारतात मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा दाखल झाला. त्यानंतर मान्सूननं गती पकडली होती. पुढील 7 ते 10 दिवसात मान्सून देशातील विविध भागात पोहोचला. यानंतर मान्सूनचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार 8 जुलैपासून बंगालच्या खाडीवरुन येणारं वारं सक्रिय होईल. त्यामुळे देशात मान्सून 8 जुलैनंतर सक्रिय होईल.
राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.
The spatial distribution of probabilistic forecasts for tercile categories (above normal, normal and below normal) for the July rainfall over the country.
Kindly visit https://t.co/dxHooJV87F for more details. pic.twitter.com/LfWGxgzL3Z
— India Meteorological Department (@Indiametdept) July 1, 2021
इतर बातम्या:
कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण
चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी
Imd predicted monsoon to be normal in month of july imd rain updates