Watermelon : कोरोनाचा प्रादुर्भाव नाही पण परिणाम कायम, भंडाऱ्यातून कलिंगडच गायब..!
एखाद्या घटकाचे परिणाम किती दुरगामी होऊ शकतात याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यात पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलावरुन लक्षात येईल. उन्हाळ्याच्या तोंडावर कलिंगड बाजारात हे ठरलेलंच होतं. कारण जिल्ह्याला वैनगंगा नदीचा विस्तीर्ण पात्र लाभलेले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पाणीटंचाई नाहीच. गेल्या सात वर्षापासून शेतकऱ्यांनी कलिंगड या हंगामी पिकावर भर दिला होता.
भंडारा : एखाद्या घटकाचे परिणाम किती दुरगामी होऊ शकतात याचा प्रत्यय (Bhandara District) भंडारा जिल्ह्यात पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलावरुन लक्षात येईल. उन्हाळ्याच्या तोंडावर (Watermelon Crop) कलिंगड बाजारात हे ठरलेलंच होतं. कारण जिल्ह्याला वैनगंगा नदीचा विस्तीर्ण पात्र लाभलेले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पाणीटंचाई नाहीच. गेल्या सात वर्षापासून शेतकऱ्यांनी कलिंगड या हंगामी पिकावर भर दिला होता. त्यामुळे कलिंगड उत्पादन आणि निर्यात यामध्ये जिल्ह्याची वेगळी अशी ओळख निर्माण झाली होती. पण कोरोनामुळे ही ओळख मोडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेली दोन वर्ष (Corona Effect) कोरोनामुळे जे निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे कलिंगड विक्री झालीच नाही. कलिंगड वावरातूनही बाहेर निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी मध्यंतरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवडच केली नाही. परिणामी निर्यात करणाऱ्या जिल्ह्यावरच वाढीव दराने कलिंगड खरेदी करण्याची नामुष्की ओढावली आहे.
कलिंगड दरात पाच पटीने वाढ
उत्पादन घटले की दर वाढणारच हा बाजारपेठेचा नियमच आहे. त्याप्रमाणेच कलिंगडची अवस्था झाली आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. पण जिल्ह्यातील उत्पादकांनी कलिंगड लागवडीकडे पाठ फिरवल्याने कलिंगडचे शॉर्टेज निर्माण झाले आहे. परिणामी 15 ते 20 रुपायांना मिळणारे टरबूजाचे दर आता 80 रुपयांवर पोहचलेले आहेत. त्यामुळे दोन वर्षापूर्वी निर्यात करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनाच अधिकच्या पैशात टरबूजाची खरेदी करावी लागत आहे. हंगामानुसार कलिंगडचे उत्पादन घेतले जात होते. पण यंदाही कोरोनामुळे बाजार पेठेवर निर्बंध आले तर काय करावे म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादनच घेतले नाही.
कोरोनाचा काय परिणाम झाला?
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्याची कंबर मोडली असून कोरोना काळात ग्राहकच न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची टरबूज शेतातच सडल्याची स्थिती निर्माण झाली होती तर दूसरी कड़े जिथे ग्राहक मिळाले तिथे कवडीमोल भावाने विकावे लागल्याची परिस्थिती उद्धवली होती. आता उत्पादनच खर्च न निघाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या टरबुज शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच मोजक्या शेतकऱ्यांनी टरबूज शेती केली असून जिल्हा मध्ये आता मागणी बघता टरबूज चे शोर्टेज निर्माण झाले आहे.
यंदा दर कायम राहणार
केवळ भंडारा जिल्ह्यातच नाही तर सर्वत्र हीच परस्थिती आहे. कोरोनामुळे चांगल्या मालाचेही नुकसानच झाले होते. गतवर्षी अनेक ठिकाणी तर कलिंगड हे फुकट वाटण्यात आले होते. यंदाही मध्यंतरी तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच कलिंगड लागवडीचा मोसम होता. मात्र, गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही स्थिती ओढावली तर काय म्हणून शेतकऱ्यांनी कलिंगडला दुसऱ्या पिकाचा पर्याय निवडला आहे. मागणीच्या तुलनेत कलिंगडची पुरवठा झाला नाही तर दरात कायम वाढ राहणार असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Photo Gallery : जुनं तेच सोनं, दर वाढीनंतरही राजस्थानी माठची नंदूरबारकरांना भुरळ