Pomegranate Garden : खोड कीडीने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा आधारच हिसकावला, डाळिंब बागा जमिनदोस्त करण्याची नामुष्की

डाळिंब बागामुळे दुष्काळी आणि खडकाळ भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला होता. गेल्या काही वर्षापासून डाळिंब उत्पादनामुळे सांगोला तालुक्याची वेगळी अशी ओळखही निर्माण झाली होती. एवढेच नाही तर येथील डाळिंबाची निर्यात होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदलही झाला होता. पण निसर्गाचा लहरीपणा या बागांवर असा काय बेतला आहे की डाळिंब बाग मोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. खोडकीडीवर अजूनही प्रभावी औषध मिळाले नाही. शिवाय खोडकीडीचे झाड कायम ठेवले तर त्याचा इतर उत्पादनावरही परिणाम होतो.

Pomegranate Garden : खोड कीडीने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा आधारच हिसकावला, डाळिंब बागा जमिनदोस्त करण्याची नामुष्की
खोड कीडीमुळे डाळिब बागा उध्वस्त करण्याची नामुष्की सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढावली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 1:48 PM

सांगोला : डाळिंब बागामुळे (Drought) दुष्काळी आणि खडकाळ भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला होता. गेल्या काही वर्षापासून (Pomegranate Garden) डाळिंब उत्पादनामुळे सांगोला तालुक्याची वेगळी अशी ओळखही निर्माण झाली होती. एवढेच नाही तर येथील डाळिंबाची निर्यात होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदलही झाला होता. पण निसर्गाचा लहरीपणा या बागांवर असा काय बेतला आहे की डाळिंब बाग मोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. (Pest Outbreak) खोडकीडीवर अजूनही प्रभावी औषध मिळाले नाही. शिवाय खोडकीडीचे झाड कायम ठेवले तर त्याचा इतर उत्पादनावरही परिणाम होतो. म्हणून ज्या डाळिंब बागाचा आधार सांगोल्यातील शेतकऱ्यांना होता त्याच उभ्या बागा जमिनदोस्त कराव्या लागल्या आहेत. तालुक्यातील एकतपूर येथील शेतकऱ्याने डाळिंब बागेवर थेट रोटाव्हेटर फिरवला आहे. वातावरणातील बदलामुळे ही नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

डोंगरमाथ्यावर बहरत होत्या बागा

सांगोला तसा दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील क्षेत्र डाळिंबासाठी पोषक आहे. डाळिंबासाठी खडकाळ जमिनच चांगली मानली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन डाळिंबाची लागवड केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब हेच मुख्य पीक केले होते. बागायत क्षेत्र नसले तरी डाळिंबासाठी अनुकूल वातावरण आणि पाण्याची सोय केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली होती.

खोड कीडीचा परिणाम काय?

वातावरणातील बदलामुळे डाळिंबावर खोड कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून तर यामध्ये वाढ झाली आहे. खोड कीडीवर प्रभावी औषधच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय या कीडीचा प्रादुर्भाव झालेले झाड नष्ट न केल्यास इतर पिकांनाही याचा धोका निर्माण होतो. यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. सध्या डाळिंबाची तोडणी झाल्यानंतर आता थेट बागाच उध्वस्त केल्या जात आहेत.

दोन वर्ष क्षेत्र राहणार रिकामे

खोड कीड नष्ट होईपर्यंत डाळिंबाची लागवड करता येणार नाही. किमान 2 वर्ष तरी या कीडीचा प्रादुर्भाव कायम राहतो. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा असा काय परिणाम झाला आहे की, त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट पीक पध्दतीमध्येच बदल करावा लागला आहे. मुख्य पीकाची ही अवस्था झाली असतानाही प्रशासनाकडून कोणती मदत झाली नसल्याची खंत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. शिवाय मध्यंतरी मंगळवेढा येथे याच खोडकीडीची पाहणी थेट केंद्रीय पथकाकडून होऊनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही हे विशेष.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : जुनं तेच सोनं, दर वाढीनंतरही राजस्थानी माठची नंदूरबारकरांना भुरळ

Sugar Factory : महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांची धुराडी बंद तरीही साखर उत्पादनात राज्य अव्वल स्थानी..!

Nanded : नांदेडमधील लाखो हेक्टरावरील वनराई उजाड त्यात वनक्षेत्रातच शेती व्यवसाय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.