Soybean : पावसाळी पिकाला उन्हाच्या झळा, फुलअवस्थेत असलेल्या सोयाबीनवर परिणाम काय?
सोयाबीन हे तसे खरिपातील पीक मात्र, पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होते परंतु गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सोयाबीनला सातत्याने पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असतानाही वाढत्या ऊनामुळे सोयाबीन वाढीवर परिणाम झाला आहे.
लातूर : सोयाबीन हे तसे खरिपातील पीक मात्र, पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन (Summer Season) उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होते परंतु गेल्या आठ दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. (Soybean) सोयाबीनला सातत्याने पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असतानाही वाढत्या ऊनामुळे सोयाबीन वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे निम्मा कालावधी उलटून गेल्यावर आता याचा उत्पादनावर काय परिणाम होणार का ते पहावे लागणार आहे. उन्हाळी सोयाबीनमधून शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. यातच कृषीपंपासाठी केवळ 7 विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनसाठी महत्वाचा काळ असून शेतकऱ्यांना योग्य नियोजनच करावे लागणार आहे.
वाढत्या तापमानामुळे सोयाबीन कोमेजले
सोयाबीन हे चार महिन्याचे पीक आहे. उन्हाळी सोयाबीनचा पेरा करुन अडीच महिने उलटले आहेत. शिवाय 15 मार्चपर्यंत मराठवाड्यातील अनेक गावचा शिवार कधी नव्हे तो उन्हाळ्यात हिरवागार झाला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा योग्य निर्णय घेतला असून यामधून केवळ खरिपातील बियाणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तर उतारा चांगला पडला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. दिवस उजाडताच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सोयाबीन हे कोमेजून जात आहे. याचा उत्पादनावर परिणाम होऊ नये हीच अपेक्षा शेतकरी बाळगत आहेत.
वाढत्या ऊन्हामुळे फुल लागवडीवर परिणाम
यंदा दोन टप्प्यामध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे. 100 दिवसांच्या वाणास 45 दिवस तर 120 दिवसाच्या वाणास 75 दिवस उलटून गेले आहेत. 15 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पेरा केला आहे त्या सोयाबीनला फुले लागलेली आहेत. पण उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीनला अधिकच्या ऊनाचा परिणाम होऊ लागला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?
सोयाबीन हे पावसाळी पीक आहे पण यंदा उन्हाळ्यातही याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. आतापर्यंत पाण्याची उपलब्धता आणि ढगाळ वातावरण यामुळे या पिकावर काही परिणाम झालेला नव्हता. पण गेल्या आठ दिवसांपासून ऊन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. फुल अवस्थेतील सोयाबीनला स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पाणी दिले तर पाण्याची बचत आणि सोयाबीनची तहानही भागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी दोन महिने योग्य ते नियोजनच करावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Cotton : कापसाचे उत्पादन ‘रामभरोसे’च, अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणेचा नेमका फायदा काय?
Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास