PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ पाच कारणांमुळे पीएम किसान योजनेच्या पैशाला शेतकरी मुकणार..!
ग्रामीण भागात अनेकजण हे बठईने शेती करतात. अशा परस्थितीमध्ये कष्ट करणाऱ्या सरकत्याच्या नावावर जमिन असेलच असे नाही. त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही.तर दुसरीकडे तुम्ही जर वडिलोपार्जित शेती करीत असताल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुमच्या नावावर जमिन असणे गरजेचे आहे.
मुंबई : (PM Kisan Scheme) पीएम किसान सन्मान निधी योजना ही जेवढी केंद्र सरकारसाठी महत्वाची योजना आहे, त्याहून अधिक (Small holder farmer) अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे. गेल्या 4 वर्षापासून या योजनेत सातत्य राहिले असून वर्षाकाठी 6 हजार रुपये हे (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. यामधू शेती अवजारे तसेच शेतीच्या इतर कामासाठी या निधीचा उपयोग होईल असा विश्वास केंद्र सरकारला आहे. त्यामुळे देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये जे पात्र नाहीत असे नागरिकही लाभ घेत असल्याने केंद्राने नियमावलीत बदल केले आहेत. ऐन 12 टप्पा तोंडावर असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचिर राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- सातबाऱ्यावर नाव गरजेचे ग्रामीण भागात अनेकजण हे बठईने शेती करतात. अशा परस्थितीमध्ये कष्ट करणाऱ्या सरकत्याच्या नावावर जमिन असेलच असे नाही. त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही.तर दुसरीकडे तुम्ही जर वडिलोपार्जित शेती करीत असताल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुमच्या नावावर जमिन असणे गरजेचे आहे.
- ई-केवायसी अनिवार्य पीएम किसान योजनेत अनियमितता होत असल्याने 12 व्या हप्त्यापासून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली असेल तरच शेतकऱ्यांना योजनेतील निधी मिळणार आहे. दिवसेंदिवस सरकारची फसवणूक होत असल्याने निदर्शनास आल्याने ही अट लादण्यात आली आहे.
- उत्पन्नावरही सर्वकाही अवलंबून जर तुमचे मासिक उत्पन्न हे 10 हजाराहून अधिक असेल किंवा यापेक्षा अधिकची पेन्शन तुम्हाला मिळत असेल तर मात्र, योजनेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत असे असतानाही योजनेचा लाभ घेतला असेल तर मात्र, हे पैसे परत करावे लागणार आहेत. आतापर्यंत कोट्यावधी रुपये सरकारने वसुल केले आहेत.
- बॅंक खातेही महत्वाचे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तुम्ही कोणते बॅंक खाते दिले आहे ते देखील महत्वाचे आहे. कारण दिलेला तपशील आणि जमा होणाऱ्या खात्यामध्ये एकसुत्रता नसेल तरीही तुमचे पैसे हे राखून ठेवले जाणार आहेत. त्यामुळे लागलीच तुम्हाला पैसे मिळतील असे नाही. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करुनच हे 2 मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
- अर्जावरील माहितीही महत्वाची पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तुम्ही जो अर्ज केला आहे, त्यामध्ये सर्व माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे. आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग किंवा जन्म तारिख ही जर का चुकीची असेल तरीही तुम्हाला निधी हा लागलीच मिळणार नाही. त्यानंतर योग्य त्या कागदपत्रांचाच पुरवठा करावा लागणार आहे.