शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: आता उरले दोनच दिवस, ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार

15 ऑगस्ट 2021 पासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली होती. खरीप हंगामात 98 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची अचूक नोंद केली होती. त्यामुळे नुकसानभरपाईही मिळाली. आता रब्बी हंगामातही हीच पध्दत अवलंबण्यात येत आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांकडे केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: आता उरले दोनच दिवस, 'ही' प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार
'ई-पीक पाहणी'या अॅपमध्येच खरेदी नोंदणी हा पर्याय खुला केला जाणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 9:29 AM

लातूर : खरीप हंगामापासून सुरु करण्यात आलेल्या (E-Pik Pahani) ‘ई-पीक पाहणी’ चा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. माझी शेती, माझा सातबारा अन् माझ पीक या घोषवाक्यानुसार शेतकऱ्यांनाच आपल्या पिकांची नोंद करायची आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली होती. खरीप हंगामात 98 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची अचूक नोंद केली होती. त्यामुळे नुकसानभरपाईही मिळाली. आता (Rabi Season) रब्बी हंगामातही हीच पध्दत अवलंबण्यात येत आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून (Record of crops) पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांकडे केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. खरीप हंगामाच्या दरम्यान याबाबत जनजागृती करण्यात आल्याने ही प्रक्रिया शेतकऱ्यांना अवगत झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्याचे आवाहन कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अॅप अपडेट प्रक्रिया मात्र तीच..

रब्बी हंगामात पेरा केलेल्या पिकांची नोंद ही ‘ई-पीक पाहणी’ या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच भरावी लागणार आहे. याबाबत खरीप हंगामात कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची नोंद करताना अपडेट अॅप घ्यावे लागणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हे अॅप अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता पीक नोंदीसाठी तलाठ्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांनाच 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंद करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना या माध्यमातून नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.

रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी

रब्बी हंगामातील पिके बहरलेली आहेत. यंदा पावसामुळे पेरण्या उशिराने झाल्या होत्या. त्यामुळे पीक नोंदणीसाठीही वाढीव कालावधी देण्यात आला होता. आता 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्येच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची नोंद करावी लागणार आहे. रब्बी हंगामात विशेष करुन हरभरा, गहू, राजमा, ज्वारी या पिकांचा पेरा झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय यंदा शेतकऱ्यांना आलेलाच आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर ‘ई-पीक नोंदणी’ हेच महत्वाचे ठरणार आहे.

अशाप्रकारे करा आपल्या शेतातील पिकाची ई-पिक पाहणी

शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पिक पाहणी’ हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. हे अॅप ओपन करुन नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर मोबाईलवर चार अंका पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे तो एसएमएस द्वारे पाठवला जाईल.

  • यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे. अॅप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे.
  • त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं पिक आहे तेच निवडायचे यातील वेगवेगळे प्रकारही असू शकतात. त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेराचा पर्याय येईल यातून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे.
  • सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली.. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे…अशा प्रकारे ‘ई-पिक पाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांची मंदीत-संधी, जे मुख्य पिकांतून मिळाले नाही ते हंगामी पिकांतून पदरी पडणार का?

State Government: आता एकाच छताखाली शेतकऱ्यांना मिळणार सर्व रोपे, काय आहे राज्य सरकारचा प्लॅन?

बारमाही मागणी असलेल्या डाळिंबातून कमी काळात अधिकचे उत्पन्न, लागवडीच्या वेळी घ्यावी लागणार ‘ही’ काळजी..!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.