Kharif Season : शेतकऱ्यांनो चिंता सोडा- कामाला लागा, खरिपाच्या तोंडावर कृषी विभागाचे काय आहे आवाहन ?

खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस ही दोन महत्वाची पिके आहेत. यंदाच्या खरिपात कापसाच्या 1 कोटी 71 लाख बियाणे पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. राज्यात बीटी कापसाचे 98 टक्के क्षेत्र आहे तर याच्या बियाणांची 2 कोटी 1 लाख एवढी पाकिटे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तर सोयाबीनच्या पिकासाठी 34 लाख 5 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता असते. तर 48 लाख 82 हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

Kharif Season : शेतकऱ्यांनो चिंता सोडा- कामाला लागा, खरिपाच्या तोंडावर कृषी विभागाचे काय आहे आवाहन ?
खरीप हंगाम
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 1:32 PM

मुंबई : (Kharif Season) खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बियाणे आणि खताबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करुन अधिकच्या (Seed Rate) दराने बियाणे आणि खताची विक्री होऊ शकते. (Maharashtra) राज्यात बियाणांचा मुबलक साठा तर आहेच पण खताचीही चिंता भासणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. ही कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने विक्री केली जाऊ शकते. याच अफवांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका बी-बियाणांचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. राज्यात निर्माण केल्या जात असलेल्या वातावरणावर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सत्य परस्थिती सांगितली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे.

खरीप बियाणांची काय स्थिती?

खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस ही दोन महत्वाची पिके आहेत. यंदाच्या खरिपात कापसाच्या 1 कोटी 71 लाख बियाणे पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. राज्यात बीटी कापसाचे 98 टक्के क्षेत्र आहे तर याच्या बियाणांची 2 कोटी 1 लाख एवढी पाकिटे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तर सोयाबीनच्या पिकासाठी 34 लाख 5 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता असते. तर 48 लाख 82 हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य पिकांसाठी तर काही धोका राहणार नाही.

मागणीपेक्षा अधिकच्या खताला मंजुरी, पुरवठ्याचे काय?

दरवर्षीच्या सरासरीनुसार खताचा वापर ठरला जातो. गेल्या 3 वर्षातील सरासरी पाहता यंदा खरिपात 41 लाख 73 हजार टन खताचा वापर आहे. यंदा केंद्र सरकारने मोठी तयारी केली असली तरी जागतिक स्तरावरील खतांबाबत निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम आहे. त्यामुळे मागणीपेक्षा खत पुरवठ्यासाठी मंजुरी देण्यात आली असली प्रत्यक्षात पुरवठा होणार का यावर शंका उपस्थित केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

अनियमितता टाळा अन् उत्पादन वाढवा

उत्पन्नाच्या दृष्टीने खरीप हंगाम हा महत्वाचा आहे. गतवर्षी अधिकच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची बियाणे आणि खतामधून फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषि विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून अनियमितता टाळण्यासाठी याचा उपयोग होईल असा आशावाद कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.