Nanded : नांदेडमधील लाखो हेक्टरावरील वनराई उजाड त्यात वनक्षेत्रातच शेती व्यवसाय

वनक्षेत्र ही एक नैसर्गिक देण आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही खऱ्या अर्थाने प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, जबाबदारीचे भान सोडाच पण नांदेड जिल्ह्यामध्ये वनसंपदाच धोक्यात आली आहे. जागतिक वनदिनाच्या निमित्ताने या नैसर्गिक देण बद्दल वन्यप्रमेंनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे 1 लाख 20 हजार हेक्टरावरील वनराई ही उजाड झाली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड अशी कारणे असली तरी या वनक्षेत्रातच आता शेती व्यवसाय करण्याचेही धाडस वाढत आहे.

Nanded : नांदेडमधील लाखो हेक्टरावरील वनराई उजाड त्यात वनक्षेत्रातच शेती व्यवसाय
नांदेड जिल्ह्यातील वनक्षेत्राला सातत्याने आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वनराई उजाड होत आहे.
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 11:32 AM

नांदेड :  (Forest area) वनक्षेत्र ही एक नैसर्गिक देण आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही खऱ्या अर्थाने प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, जबाबदारीचे भान सोडाच पण (Nanded District) नांदेड जिल्ह्यामध्ये वनसंपदाच धोक्यात आली आहे. जागतिक वनदिनाच्या निमित्ताने या नैसर्गिक देण बद्दल वन्यप्रमेंनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे 1 लाख 20 हजार हेक्टरावरील वनराई ही उजाड झाली आहे. यामध्ये अवैध (felling of trees) वृक्षतोड अशी कारणे असली तरी या वनक्षेत्रातच आता शेती व्यवसाय करण्याचेही धाडस वाढत आहे. काळाच्या ओघात वृक्षसंवर्धन होणे गरजेचे असताना नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र, वेगळेच चित्र समोर येत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये असताना केवळ संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने हे क्षेत्र उजाड होत आहे. जागतिक वनदिनाच्या निमित्ताने केले जाणारे आवाहन नांदेडकरांनी वर्षभर पालन करणे गरजेचे आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र नांदेड जिल्ह्यामध्ये

मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 64 हजार 813 चौरस किलोमीटर म्हणजेच 4.1 टक्के आहे. असे असताना 3.26 टक्केच क्षेत्र वनाच्छादित आहे. यामध्ये औरंगाबादमध्ये 7.46, जालना 1.28, परभणी 1.53, हिंगोली 5.98 तर नांदेड 9.47 टक्के क्षेत्र आहे. असे असतानाही संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे.

वनक्षेत्रात या झाडांचा आहे समावेश

येथील विस्तीर्ण वनक्षेत्रात पिंपळ, गुलमोहर, बांबुसा, उंबर, सीताफळ, जांभूळ, सप्तपणर्णी, आवळा, चिंच, मोहबेल, कडूनिंब, आंबा, चारोळी, अशोक, पळस या वृक्षांचा समावेश आहे. मात्र, ज्या किनवट, माहूर, उमरी भोकर भागात अधिकचे क्षेत्र आहे त्याच भागात वृक्षतोड होत असल्याने जंगल हे विरळ होताना दिसत आहे.

वन्यप्रेमींनी केली चिंता व्यक्त

मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील वनसंपदा धोक्यात आलीय, आज असणाऱ्या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने वन्यप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केलीय. सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे नांदेडमधलं एक लाख वीस हजार हेक्टरवरची वनराई उजाड झालीय. नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे, मात्र बेसुमार वृक्षतोड होत असल्याने वनक्षेत्र कमी होत चाललंय. संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली तरच जिल्ह्याची वेगळी अशी ओळख राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton : कापसाचेच नव्हं यंदा तर फरदडचेही सोनं, अंतिम टप्प्यातही Market ‘भारीच’

PM मोदींनी Zero Budget शेतीचे फायदे सांगितले, अलिबागच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, अडीच गुंठ्यात अस्सल मिरचीचा ‘ठसका’

E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीची होणार नोंदणी, शेतकऱ्यांच्या समस्येवर रामबाण उपाय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.