Green Fodder : उन्हाळ्यात चवळी चारा पिकाचा आधार, हिरवा चारा अन् दूध उत्पादनातही वाढ

सध्या मार्च महिना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आतापासून पावासाला सुरवात होईपर्यंत जनावरे हिरव्या चाऱ्याला मुकणार आहेत. शिवाय शेतामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पुढील चार महिने तरी हिरव्या चाऱ्यासाठी जनावरांना वाट पहावी लागणार आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता असेल तर आतापासूनच हिरव्या चाऱ्याची व्यवस्था सहज करता येणार आहे. मात्र, ऐन हिवाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली तर मात्र, त्याचा परिणाम दुधावर होणार आहे. त्यामुळे द्विधल असणाऱ्या चवळीचा चारा म्हणून योग्य उपयोग होईल.

Green Fodder : उन्हाळ्यात चवळी चारा पिकाचा आधार, हिरवा चारा अन् दूध उत्पादनातही वाढ
द्विदल चवळीचा हिरवा चारा उन्हाळ्यात जनावरांसाठी पोषक आहे.
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 4:31 PM

मुंबई : सध्या मार्च महिना अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आतापासून पावासाला सुरवात होईपर्यंत जनावरे हिरव्या चाऱ्याला मुकणार आहेत. शिवाय शेतामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पुढील चार महिने तरी (Green Fodder) हिरव्या चाऱ्यासाठी जनावरांना वाट पहावी लागणार आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता असेल तर आतापासूनच हिरव्या चाऱ्याची व्यवस्था सहज करता येणार आहे. मात्र, ऐन (Summer Season) उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली तर मात्र, त्याचा परिणाम दुधावर होणार आहे. त्यामुळे द्विधल असणाऱ्या (Chewy fodder) चवळीचा चारा म्हणून योग्य उपयोग होईल. याची वारंवार कापणी करुनही पुन्हा चारा म्हणून उपयोग करता येणार आहे. यासाठी चवळी हाच योग्य पर्याय आहे.हे अधिक पौष्टिक आणि पचण्याजोगे आहे. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढते. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे शेतीची खत क्षमता देखील वाढते, ज्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकात फायदा घेता येतो. चवळीमुळे तणांचा नाश करून जमिनीची सुपीकताही वाढते. चवळीची लागवड ही खरिपात आणि रब्बी हंगामातही करता येते.

चवळी लागवडीसाठी आवश्यक गोष्टी

द्विदल चवळीची लागवड करण्यासाठी निचरा होणारी शेतजमिन गरजेची आहे. याकरिता हलक्या किंवा चांगल्या प्रतीची जमिन असे काही लागत नाही. केवळ एका जागी पाणी साचून राहिल अशी जमिन नसायला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती निवडण्यासाठी फार विचार करण्याची गरज भासणार नाही. शेती तयार करण्यासाठी चांगली नांगरणी आवश्यक आहे. त्यामुळे उगवण तर चांगली होतेच शिवाय उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम आहे. शेतकऱ्यांना चवळीची शेती करायची असेल तर हाच काळ त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. ते मार्चच्या अखेरीस चवळीची लागवड करता येते शिवाय शेतकऱ्यांकडे यंदा पाणी मुबलक प्रमाणात आहे.

चवळीचे प्रगत वाण

शेतकऱ्यांना पुरेशा चाऱ्यासाठी केवळ प्रगत प्रकारच्या चवळीचे निवड करण्याचा सल्ला दिला जात आहे. उत्तर भारतात लागवडीसाठी प्रचलित प्रगत वाण चवळी म्हणजे कोहिनूर होय. महाराष्ट्रासाठी श्वेता, बुंदेल चवळी-2 आणि बुंदेल लोबिया-3 या फळांची लागवड संपूर्ण भारतात लागवड करता येते. तामिळनाडूसाठी एफसी-8, उत्तर पश्चिम, ईशान्य, यूपीसी-607, 618 आणि डोंगराळ राज्यांसाठी 622 जाती सर्वोत्तम आहेत. एका हेक्टरमध्ये 40 किलोची लागवड पुरेशी आहे. ज्वारी आणि मकासोबत चवळीची लागवड करायची असेल तर हेक्टरी 20 किलो बियाणे पुरेसे आहे.चलळीला 8 ते 10 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा केला तरी उत्पादनात वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

PM Kisan Yojna : अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर Zero Balance, योजनेतील निधीची वसुली करायची कशी ?

चिंताळा तलावातील Water Lotus ने वाढवली मत्स्य व्यवसायिकांची ‘चिंता’, तलावाला पाणवनस्पतीचे अच्छादन

Toor Crop : हमीभावापेक्षा दरवाढीवरच शेतकऱ्यांचे लक्ष, सोयाबीनचेच सूत्र तुरीलाही लागू..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.