Sugarcane Sludge : हंगाम अंतिम टप्प्यात, यंदा साखरेचा गोडवा वाढला, 350 लाख टनाचा टप्पा गाठला

4 महिन्याचा गाळप हंगाम यंदा कधी नव्हे तो 7 महिने सुरु राहिला होता. उत्पादनाबरोबरच यंदा ऊसाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे हे परिणाम आहेत. शिवाय साखऱ कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुन देखील राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर हंगाम संपल्यात जमा असून देशात केवळ 29 साखर कारखाने हे सुरु आहेत.

Sugarcane Sludge : हंगाम अंतिम टप्प्यात, यंदा साखरेचा गोडवा वाढला, 350 लाख टनाचा टप्पा गाठला
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:12 AM

पुणे : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जेवढ्या अडचणी गाळप हंगामात आल्या आहेत त्याच पटीने (Sugar Production) साखर उत्पादनातून दिलासाही मिळाला आहे. यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात 522 साखर कारखान्याच्या माध्यमातून हंगाम पार पडला असून सर्वाधिक उत्पादन हे (Maharashtra) महाराष्ट्रातून झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशात 350 लाख टनाचा टप्पा साखरेने पार केला होता. आतापर्यंत सर्वाधिक उत्पादन यंदा झाले आहे. गतवर्षी 307 लाख टन उत्पादन झाले होते. असे असले तरी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे तर दुसरीकडे साखर कारखानेही बंद झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसाचे काय होणार हा प्रश्न आहे.

29 साखर कारखाने सुरुच

4 महिन्याचा गाळप हंगाम यंदा कधी नव्हे तो 7 महिने सुरु राहिला होता. उत्पादनाबरोबरच यंदा ऊसाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे हे परिणाम आहेत. शिवाय साखऱ कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुन देखील राज्यात अनेक ठिकाणी अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर हंगाम संपल्यात जमा असून देशात केवळ 29 साखर कारखाने हे सुरु आहेत. यंदा 45 लाख टन अधिकचे साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे.

हंगामापूर्वीच घेतला जाणार ऊस तोडणीचा अंदाज

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. शिवाय यंदा सारखीच पुन्हा परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 2022 च्या उत्तरार्धात उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुढील वर्षी किती ऊस तोडणीसाठी असणार आहे. याबाबतचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्याचे नियोजन केले जाणार आहे. यंदा अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील वर्षी हीच वेळ येऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक गाळप अन् उत्पादन महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक ऊसाचे गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. असे असले तरी अतिरिक्त उसाचा प्रश्नही याच महाराष्ट्रात राहिलेला आहे. गेल्या तीन वर्षापासून अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस बरसत असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. यंदा तर 7 महिने हंगाम सुरु राहिला आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...