Sugarcane Sludge: हंगामाच्या अंतिम टप्प्यात पेटणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न, ऊस फडात अन् कारखान्यांची आवराआवर
गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात किती ऊसाचे गाळप झाले यापेक्षा किती ऊस शिल्लक आहे याचीच चर्चा रंगली आहे. यंदा कधी नव्हे तो गाळप हंगाम सात महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीपर्यंत सुरु राहिलेला आहे. असे असतानाही जिल्ह्यात 20 ते 25 हजार हेक्टरावरील ऊसाचे गाळप शिल्लक आहे. तर दुसरीकडे ऊसटोळ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला असून साखर कारखान्यांची आवराआवर सुरु झाली आहे.
सांगली : गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात किती (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप झाले यापेक्षा किती ऊस शिल्लक आहे याचीच चर्चा रंगली आहे. यंदा कधी नव्हे तो गाळप हंगाम सात महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीपर्यंत सुरु राहिलेला आहे. असे असतानाही जिल्ह्यात 20 ते 25 हजार हेक्टरावरील ऊसाचे गाळप (Surplus sugarcane) शिल्लक आहे. तर दुसरीकडे ऊसटोळ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला असून (Sugar Factory) साखर कारखान्यांची आवराआवर सुरु झाली आहे. त्यामुळे उर्वरीत ऊसाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कारखान्याची धुराडी बंद करु नये अन्यथा साखर कारखान्याच्या संचालकाच्या घरासमोरच आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केवळ मराठवाड्यातच नाही पश्चिम महाराष्ट्रातही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे.
ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ
पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे यंदा ऊसाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र सबंध राज्यभर पाहवयास मिळत आहे. सांगली जिल्ह्यात मिरज,वाळवा, पलूस, कडेगांव, शिराळा, तासगाव , कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी जत या सर्वच तालुक्यातील उसाचे क्षेत्र लाख ते सव्वा लाख हेक्टर वर आहे. त्यातील सुमारे एक लाख हेक्टर वरील उसाचे गाळप झाले आहे. वरील 20 ते 25 हेक्टर वरील ऊस अद्याप बाकी आहे. दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी आणि खानापुर या तालुक्यातही योजनांचा लाभ घेतल्याने ऊसाची शेती वाढली आहे.
5 साखर कारखाने बंद राहिल्याने ऊसाचा प्रश्न
मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्यानेच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी कारखान्यांची भूमिकाही कारणीभूत ठरत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव नागेवाडी महाकाली आणि माणगंगा केन अग्ग्रो हे पाच कारखाने बंद आहेत. उसाचे पीक वाढले आणि पाच कारखाने बंद पडले त्यामुळे ऊस गाळप झालेला नाही. अंतिम टप्प्यातही ऊसतोडीचा प्रश्न कायम आहे. कारखान्यांची क्षमता पूर्ण झाल्याने ते आता आवराआवर करण्याच्या तयारीत आहेत. पण शेतकऱ्यांचा विचार करुन गाळपाचा कालावधी वाढवावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
अन्यथा कारखाना अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन
ऊस शिल्लक राहण्याची शक्यता गृहीत धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या पूर्वीच ही बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे सूचनाही देऊनही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याची तयारी सुरू केली आहे.दत्त इंडिया कारखान्याने 31 मार्चला कारखाना बंद करण्याचे जाहीर केले आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची बैठक घेऊन कारखाने बंद करू नयेत असा आदेश द्यावेत. अन्यथा जे कारखाने बंद होतील त्या साखर कारखान्याचा अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे महेश खराडे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Toor Crop : केंद्र सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण, ज्याची भीती शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा..!
Onion Market : कांद्याचे लिलाव बंद, 5 दिवसानंतर काय राहणार चित्र?
Nanded: नुकसान खरिपाचे भरपाई रब्बीत, पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी गोड बातमी..!