Agricultural Department : खरिपाच्या नियोजन बैठकांमध्येही ‘पिन होल बोरर’वरच चर्चा, डाळिंब बागा जोपासण्याचे आव्हान
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने जणूकाही शेती व्यवसायच मोडकळीस आला आहे अशी अवस्था सांगोलासह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने गावस्तरावर कृषी विभागाच्या बैठका पार पडत असताना देखील डाळिंब बागा जोपासायच्या कशा यावरच अधिक मार्गदर्शन होत आहे. सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा मृग बहराची तयारी सुरु केली आहे. मृग बहर धरणाच्या पूर्वतयारीच्या कामाने वेग घेतला आहे.
सांगोला : वातावरणातील बदलामुळे (Pomegranate) डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने जणूकाही शेती व्यवसायच मोडकळीस आला आहे अशी अवस्था सांगोलासह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या (Kharif Season) खरीप हंगामाच्या अनुशंगाने गावस्तरावर (Agricultural Department) कृषी विभागाच्या बैठका पार पडत असताना देखील डाळिंब बागा जोपासायच्या कशा यावरच अधिक मार्गदर्शन होत आहे. सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा मृग बहराची तयारी सुरु केली आहे. मृग बहर धरणाच्या पूर्वतयारीच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, ‘पिन होल बोरर’ची धास्ती ही कायम आहे. त्यामुळे कृषी विभागाचा उद्देश खरिपाचा असला तरी डाळिंबा बागाची जोपासणा आणि भविष्यात घ्यावयाची काळजी याबाबतच मार्गदर्शन करावे लागत आहे.
60 टक्के क्षेत्रावरील डाळिंब बागा मोडीत
अवकाळीच्या अवकृपेमुळे तर उत्पादनात घट झालीच पण वातवारणातील बदलामुळे पिन होल बोरर अर्थात खोड किडीचा असा काय प्रादुर्भाव झाला आहे की, शेतकऱ्यांना डाळिंब बागा मोडण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. सांगोला सारख्या दुष्काळी भागाला डाळिंब बागामुळे एक वेगळी ओळक निर्माण झाली होती. गेल्या 20 वर्षापासून शेतकरी हे डाळिंबावर भर देत आहेत. येथील खडकाळ शेतजमिन आणि भौगोलिक परस्थिती यामुळे डाळिंबाचे क्षेत्र हे वाढत गेले होते. पण गेल्या 4 ते 5 वर्षापासून वातावरणातील बदलाचा परिणाम थेट बागांवरच होत आहे. त्यामुळे यंदा तर 60 टक्के क्षेत्रावरील बागा मोडीत काढाव्या लागल्या आहेत.
शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?
शेतकऱ्यांनी डाळिंबाची अतिघन लागवड करायची नाही. लागवड करताना 4.5 मीटर बाय 3 मीटर तर पाच बाय पाच मीटर दोन रांगामध्ये अंतर ठेवावे लागणार आहे. कीडनियंत्रणासाठी ड्रेचिंगचा वापर करता येणार नाही. याशिवाय कुजलेले कंपोस्ट खत व जैविक कीडनाशकांचा वापर वाढवावा लागणार आहे. त्यामुळे कृषी अधिकारी, कृषितज्ञ आणि विद्यापीठांच्या माध्यमातून डाळिंबाला नवसंजीवनी मिळणार आहे.
खरिपासाठी कृषी विभागाचा पुढाकार
सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात असताना खरिपाचे नियोजन कसे करायचे याबाबत शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्याच्या अनुशंगाने राज्यभर शेतकरी मेळावे आणि गावस्तरावर बैठका पार पडत आहे. सोयाबीन हे जरी खरिपातील मुख्य पीक असले तरी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी नगदी पिकांवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. शिवाय घरगुती बियाणे वापरल्याने होणारी फसवणूक टळणार आहे तर वाढत्या खर्चालाही आळा बसणार आहे. यंदा रासायनिक खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच खताची साठवणूक करुन ठेवावी शिवाय अधिकचा वापर न करताच उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला बैठकीत दिला जात आहे.
संबंधित बातम्या :
Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ
Kharif Season : गावनिहाय होतेय खरीप हंगामाचे नियोजन, शेतकऱ्यांसाठी कोणत्या 25 बाबी महत्वाच्या ?
Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन