Chilly Market : तेजा मिरची ‘तेजीत’, हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर, यंदा काय राहणार मार्केटचे चित्र?
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिध्द आहे. याचे वेगळेपण म्हणजे हंगाम सुरु होण्यापूर्वीच या बाजारपेठेत मिरचीची आवक होण्यास सुरवात होते. यंदा तशीच काहीशी परस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून मिरची आवकला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तेजा मिरचीला 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर मिळालाय.
औरंगाबाद : तसं पाहिला गेलं तर (Chilly Season) मिरचीचा हंगाम सुरु होण्यासाठी आणखीन महिन्याभराचा कालावधी आहे. पण जिल्ह्यातील आमठाणा बाजार समितीचे आणि या भागात उत्पादन घेतले जाणाऱ्या (Teja Chilly) तेजा फोर मिरचीचे वेगळेपण आहे की हंगामाच्या 1 महिना आगोदर येथील मिरची बाजारात दाखल होते. यामुळे यंदा मिरचीच्या दराचे चित्र काय राहणार याचा अंदाजही बांधता येतो. आता तेजा (Chilly Rate) मिरचीचे दरही तेजीत असल्याचे हंगामाच्या सुरवातीलाच स्पष्ट झाले आहे. कारण गतवर्षी सुरवातीला 2 हजार 300 रुपये क्विंटल असा दर होता. तर यंदा सुरावातीलाच 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठेत मिळाल आहे. शिवाय याप्रमाणेच दर कायम राहतील असा अंदाजही व्यापारी व्यक्त करीत आहे. त्यामुळे यंदा तेजाचा चांगलाच ठसका उडणार हे स्पष्ट झालंय.
आमठाणा बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना अंदाज
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिध्द आहे. याचे वेगळेपण म्हणजे हंगाम सुरु होण्यापूर्वीच या बाजारपेठेत मिरचीची आवक होण्यास सुरवात होते. यंदा तशीच काहीशी परस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून मिरची आवकला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तेजा मिरचीला 4 हजार 511 रुपये क्विंटल असा दर मिळालाय. या विक्रमी दरामुळे यंदा तेजा फोर मिरचीचे काय मार्केट राहणार याचा अंदाज शेतकऱ्यांना बांधता येतो.गेल्या 10 वर्षापासून या बाजारपेठेत तेजाची आवक आणि दरही तेजीत आहेत.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय ?
निसर्गाच्या लहरीपणाचा समना करीत एप्रिल महिन्यात लागवड केलेली मिरची आता कुठे बाजारात दाखल होत आहे. मुख्य पिकांमधून तर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलच आहे पण मिरचीचा तरी आधार मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शिवाय असाच दर कायम रहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. हंगामाच्या सुरवातीचा दर समाधानकारक असून भविष्यात आवक वाढली तरी हेच दर कायम राहिले तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत.
तर अधिकच्या शेतकऱ्यांना फायदा झाला असता
यंदा जूनचा पंधरवाडा उलटला तरी पावसाचे दमदार आगमन झालेले नाही. जर नियमितपणे 1 जून रोजी पावसाने हजेरी लावली असती तर मात्र, पुर्वहंगामी उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले असते. आता अनेक भागातील पुर्वहंगामी उत्पादन उशिराने शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे 4 हजार 511 रुपयेच दर मिळेल असे नाही. काही शेतकऱ्यांना कमी दरात मिरची विक्री करावी लागणार आहे.