Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!

आगामी खरीप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा करावा यासाठी महाबीजच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक सोयाबीनचा पेरा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी करुन सोयाबीनची पेरणी केली आहे. केवळ सोयाबीन पेरणीच महत्वाची नाही तर पेरलेले सोयाबीन बियाणाच्या अनुशंगाने झाले आहे का नाही हे देखील महत्वाचे आहे.

Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!
यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. बियाणे निर्मितीच्या दृष्टीने वाढ होत आहे का याची पाहणी महाबीजचे अधिकारी करीत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:09 AM

लातूर : आगामी (Kharif Season) खरीप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा करावा यासाठी महाबीजच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक सोयाबीनचा पेरा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Mahabeej) महाबीजकडे नोंदणी करुन सोयाबीनची पेरणी केली आहे. केवळ सोयाबीन पेरणीच महत्वाची नाही तर पेरलेले सोयाबीन बियाणाच्या अनुशंगाने झाले आहे का नाही हे देखील महत्वाचे आहे. याकरिता महाबीजच्यावतीने पेरणी दरम्यानच शेतकऱ्यांना सूचना केल्या होत्या. आता त्याचप्रमाणे (Soybean Sowing) सोयाबीन पोसले गेले आहे का नाही यासाठी महाबीजचे अधिकारी-कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करीत आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन बियाणाचा तुटवडा भासणार नाही पण योग्य प्रमाणात सोयाबीनची वाढ झाली आहे का नाही याची पाहणी केली जात आहे.

बिजोत्पादनाचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

महाबीजने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक रक्कम दिली जात होती.शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन करावे या अनुशंगाने 2016-17 पासून बोनस दिला जात आहे. यामध्ये हरभरा पिकाला 131 रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीनला 2018-19 मध्ये 200 तर 19-20 मध्ये 500 रुपये असा बोनस दिला जात आहे. ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत कऱण्यासाठी 10 टक्के सीएसआर मधून निधी देण्याची तयारी संचालक वल्लभराव देशमुख यांनी दर्शवली आहे.त्यामुळे शासनाकडून 80 टक्के अनुदान तर महाबिजकडून 10 असे 90 टक्के अनुदानाचा लाभ बिजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

लातूरमध्ये महाबीजचे पीक प्रात्याक्षिके

उन्हाळी हंगामातील सोयाबीनची पेरणी होऊन आता दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुले वेळोवेळी पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेण्यासाठी महाबीज ठरवून दिलेल्या अटी-नियमांचे पालन हे शेतकऱ्यांना करावेच लागते. त्यावरच बोनस अवलंबून आहे. त्यामुळे पीक प्रात्याक्षिक केले जात असून शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या जात आहेत. यापूर्वी उन्हाळी सोयाबीनचा पेरा करा म्हणून जनजागृती करणारे अधिकारी आता पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेले आहेत.

यंदा प्रथमच विक्रमी सोयाबीन

बिगरमोसमी हंगामात यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा केला आहे. आतापर्यंत केवळ खरीप हंगामात बियाणांची उपलब्धता व्हावी हा उद्देश असायचा आता मात्र, उत्पादनाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. उन्हाळी हंगामातील पिकांना उतारा हा कमी असतो असे म्हटले जाते पण आतापर्यंत सर्वकाही सुरळीत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या अपेक्षा आहेत.

संबंधित बातम्या :

E-Pik Pahani : घटत्या नोंदणीमुळे निर्णयात बदल, शेतकरी घेणार का वाढीव मुदतीचा फायदा?

शेतीमालाच्या आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ, काय आहे केंद्राचा अहवाल?

Good News : ज्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा, आता दरातील चढ-उताराची चिंता मिटली

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.